Breaking News

भुवनेश्वरी एस यांनी स्मार्ट सिटीचा पदभार स्वीकारला

नागपूर, ता.२८ : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी बुधवारी सकाळी स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री महेश मोरोणे यांनी त्यांचे तुळसी चे रोपटे देऊन स्वागत केले. त्यानंतर श्रीमती भुवनेश्वरी यांनी मनपा आयुक्त श्री राधाकृष्णन बी यांची भेट घेतली.

श्रीमती भुवनेश्वरी एस या मूळ तामिळनाडू च्या रहिवासी असून वर्ष 2015 च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) अधिकारी आहेत. या पूर्वी त्या भंडारा व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. नागपूर स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या प्रथम आय ए एस अधिकारी आहेत. या पूर्वी शासना कडून डॉ रामनाथ सोनावणे यांची सी.ई.ओ. पदी नियुक्ती करण्यात आली होती. या वर्षी फेब्रुवारी मध्ये त्यांची महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण मध्ये सचिव पदावर नियुक्ती झाली होती तेव्हा पासून हे पद रिक्त होते. त्यामुळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांचेकडे सीइओ पदाचा प्रभार सोपविण्यात आला होता.

श्रीमती भुवनेश्वरी यांचे स्वागत मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, महाप्रबंधक राजेश दुफारे, डॉ.शील घुले, राहुल पांडे, अधि. मनजीत नेवारे, डॉ. प्रणिता उमरेडकर, मनीष सोनी, अमित शिरपुरकर, अमृता देशकर, सोनाली गेडाम, पराग अर्मल, अनूप लाहोटी, आरती चौधरी यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved