
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
वरोरा :- पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. 26/11/20 रोजी फिर्यादी संजय रामकृष्ण हिंगणकार रा वरोरा यांनी तक्रार दिली की अज्ञात आरोपीने त्याचे राहते घराचा ताला तोडून आत प्रवेश करून घरातील Samsung Led Tv 25,000 रूपये किंमतीचा चोराने चोरून नेला असल्याचे रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन अप क्र 1066/20 कलम 457, 380 भांदवी चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात सपोनि राजकीरण मडावी, पोउपनी सर्वेश बेलसरे , सहायक पोलिस उप निरीक्षक विलास बलकी, नापोशी किशोर बोढे, पोशी दिनेश मेश्राम, सुरज मेश्राम,विशाल गिमेकर,कपिल भंडारवार यांनी अत्यंत शिताफीने गोपनीय माहिती काढून आरोपी अक्षय अंकुश बावणे , व एक विधिसंघर्ष ग्रस्त बालक दोन्ही रा नवीन वस्ती कॉलॉरी वार्ड वरोरा यांना अटक करून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेला Samsun Les Tv कि. 25000 रु चा मुद्देमाल हस्तगत करून इतर गुन्ह्यात आरोपितांचा सहभाग दिसल्याने त्यांचेकडून एक Samsui Led Tv कि. 10000 चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.