Breaking News

अवैधरित्या दारु तस्करी करणाऱ्यामधे माजली खळबळ

  • पोलिसांनी गाडीसहित आरोपीस केले अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-फोरव्हिलर आकाशी निळ्या रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.३४ के. १७३२ या सॅन्ट्रो वाहनाने अवैधरित्या दारूसाठा चंद्रपूर,मुल मार्गाने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे आदर्श पेट्रोलपंपाच्या मागे पहाटे ५:३० वाजता सहकारी स्टाॅफसह पाळत ठेवली असता समोरून वाहन येत असल्याचे दिसून आले.या फोरव्हिलर वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मागील सीटच्या पायदानावर ठेवुन असलेल्या प्लॅस्टिक चुंगडीमध्ये रॉकेट देशी दारु संत्रा एकुण तिन बॉक्स मिळुन आले. वाहनासहीत दारुची एकुण २ लाक्ष ७७ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

घटनास्थळी मिळालेला व्यक्ती नामे शंकर क्रिष्णा कुंडु, वय-३१ वर्ष रा. प्रगती नगर, रयतवारी कॉलरी चंद्रपूर ता.जि. चंद्रपूर याचेविरुध्द गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. त्याचप्रमाणे दुसरी कारवाई सुमारे ९.३० वाजताच्या सुमारास एम.एच. ३४ ए.ए. ८९३३ या चेवरोलेट स्पार्क एलटी चारचाकी वाहनाने बल्लारशाह बायपास रोडने विदेशी मद्याची वाहतुक होणार आहे, अशा गुप्त माहितीचा आधारे पहाटे ०९.०० वाजता सहकारी स्टॉफसह जयश्री लॉनजवळ बल्लारपूर बायपास रोड चंद्रपूर ता.जि.चंद्रपूर येथे जावुन पाळत ठेवली असता सदर वाहन येत असल्याचे दिसताच थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने दुरुनच शासकीय गणेवेषात स्टॉफला पाहुन वाहन रस्त्याच्या कडेला उभी करुन वाहनचालक गल्ली-बोळाचा फायदा घेवुन पसार झाला.

दारुबंदी कायद्याअंतर्गत वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनाच्या डॅशबोर्डमध्ये ६ बॉक्स विदेशी दारु मिळुन आली. वाहनासहीत एकुण रु. ३ लाख ७० हजार ३२० रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्ह्याचा मुद्देमाल जप्त केला. मोक्यावरुन पसार झालेल्या इसमाचा आजुबाजुला शोध घेतला असता पस वाहनचालक मिळुन आला नाही. पसार झालेल्या वाहनचालकाविरुध्द गुन्ह्याची नोंद घेण्यात आली.

दोन्ही कार्यवाहीमध्ये एकुण ६ लाख ४८ हजार १२० रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्हयाचा मुद्देमाल मिळुन आला. पुढील तपास सुरु असून सदरची कार्यवाही सागर धोमकर अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, चंद्रपूर/गडचिरोली विभागाचे दुय्यम निरीक्षक जगदीश यु. पवार, तसेच विभागाचे जवान संदीप राठोड, प्रशांत घोडमारे, अमोल भोयर यांनी कार्यवाही पार पाडली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved