
जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर
राजुरा :- आम आदमी पार्टी राजुराच्या वतीने पंचायत समिती चौक राजुरा येथे शेतकऱ्याचा विविध मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले यंदाच्या सालात बळीराजा खुप मोट्या आर्थिक संकटात सापडला आहे सुरवातीपासूनच शेतकऱ्याला अनेक गोष्टीचा सामना करावा लागत आहे बोगस सोयाबीन बियाणंमुळे शेतकऱ्याला या बिकट कोरोना परिस्थितीत दुबार पेरणी करावी लागली याची दखल शासनाने घेतली नाही आणि बळीराजा पुन्हा कर्जाच्या मोट्या संकटात सापडला.आणि कापसावर आलेली बोंडअडी या बोंडअळी मुळे ज्या शेतकऱ्याला 100 क्विंटल कापूस होत होता त्या शेतकऱ्याला 20 ते 30 क्विंटल च्या वर कापूस होणार की नाही अशी परिस्थिती निर्मान झालेली यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्याला 30हजार हेक्टरी मदत करावी लॉकडाऊन काळातील वीज बिल सरसकट माफ करावे . बोगस बियानमुडे सोयाबीन उगवू शकले नाही शेतकरी दुबार पेरणी संकटात गेला याची दखल घेऊन त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी यासारख्या अनेक मागण्या घेऊन आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले वीजबिलाची होळी करण्यात आली राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.
आंदोलन शिक्षणाचे प्रणेते शिक्षण सम्राट महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यारपण करुन भजना द्वारे आंदोलनाची सुरवात करण्यात आली वीज बीलची होळी करण्यात आली यावेळी आपचे विदर्भ कमिटी सदश्य मनोहर पवार साहेब जिल्हाअध्यक्ष सुनील मुसडे संघटन मंत्री परमजीत सिंग झगडे जिल्हा सचिव संतोष दोरखंदे बल्लारपूर शहर अध्यक्ष बलराम केसकर कसारेजी राजुरा तालुका अध्यक्ष रोशन येवले शेतकरी आघाडी आघाडी अध्यक्ष स्वप्नील कोहपरे किसान क्रांती समन्वय समिती अध्यक्ष प्रदीपभाऊ बोबडे जेष्ठ नेते मार्गदर्शक मिलिंद गडमवार साहेब सहसंयोजक पवन ताकसांडे तुळशीराम किंनाके सहसंयोजक सुरेश लोखंडे अतुल चनकपूरे सुमित कोहपरे सूरज सुरकार किरण आत्राम राहुल चौधरी व कार्यकर्ते भजन मंडळी व शेतकरी उपस्थित होते.