
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरासाठी अर्ज करता येणार आहे त्याकरिता हि 51 शहरे मंजूर करण्यात आलेली आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील 51 शहरांची निवड करण्यात आली असून, या योजनेची अंमलबजावणी या शहरालगतच्या नियोजित क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये 1) बृहन्मुंबई, 2) पुणे, 3) नागपूर, 4) पिंपरी-चिंचवड, 5) ठाणे, 6) नाशिक, 7) नवी मुंबई, 8) सोलापूर, 9) औरंगाबाद, 10) कल्याण-डोंबिवली, 11) कोल्हापूर, 12) सांगली, 13) अमरावती, 14) मिरा भाईंदर, 15) उल्हासनगर, 16) भिवंडी, 17) अहमदनगर, 18) अकोला, 19) जळगाव, 20) नांदेड वाघाळा, 21) धुळे, 22) मालेगाव, 23) वसई विरार, 24) लातूर, 25) परभणी, 26) चंद्रपूर, 27) इचलकरंजी, 28) जालना, 29) भुसावळ, 30) पनवेल, 31) सातारा, 32) बीड, 33) यवतमाळ, 34) गोंदिया, 35) बार्शी, 36) अचलपूर, 37) उस्मानाबाद, 38) नंदूरबार, 39) वर्धा, 40) उदगीर, 41) हिंगणघाट, 42) अंबरनाथ, 4.3) बदलापूर, 44) बुलडाणा, 45) गडचिरोली, 46) वाशिम, 47) भंडारा, 48) हिंगोली, 49) रत्नागिरी, 50) अलिबाग, 51) सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग अशी एकूण 51शहरांची नावे मंजूर करण्यात आली.
केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यामध्ये आता पर्यंत केवळ त्या शहरात रहिवासी राहणाऱ्या व्यक्तीलाच अर्ज करता येतो. परंतु शासनाने आता राज्यातील कुठलाही व्यक्ती कोणत्याही शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अर्ज करता येणार असल्याची माहिती पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितले.