
जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर
चिमूर :- भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मालेगाव येथील राहणाऱ्या नरेंद्र ननावरे ३३ वर्षीय यांने गावातीलच ९० वर्षीय वृद्धेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. २६ नोव्हेंबरला रात्री आरोपी नरेंद्र नन्नावरे यांनी अंधाराचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या घरी प्रवेश केला, पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला, त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जेव्हा वृद्धेच्या खोलीकडे धाव घेतली असता पुढचं दृश्य त्यांच्या मनाला हादरावणारे होते.
वृद्ध महिला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती, महिलेने घडलेला प्रकार मुलाला सांगितला असता त्यांनी तात्काळ भीसी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी नरेंद्र नन्नावरे च्या विरोधात तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ ३७६, ४५० व ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल करीत आरोपी नरेंद्रला अटक केली.
ही संतापजनक घटना गावातील नागरिकांना माहिती पडली असता त्यांनी तात्काळ त्या नराधम वृत्तीच्या नरेंद्रला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.