Breaking News

पोलिसांवर केला प्राणघातक हल्ला आरोपीस केले अटक

जिल्हा प्रतिनिधी / सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिवसेनदिवस दारू विक्रेत्यांची संख्या वाढतच चालली आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज भद्रांवती शहरातील माता मंदिर परिसरात अवैधरीत्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीस पोलिस धाड टाकण्यासाठी गेले असता दारू विक्रेत्यानी पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांच्यावर सत्तुर उगारल्याची घटना घडली. हा प्रकार बघता पोलिसांनी सावधगिरी बाळगून आरोपीला अखेर अटक केली.

आरोपीचे नाव आकाश महादेव खंडाळकर वय 30 शिवाजीनगर असे असून तो माता मंदिर परिसरात अवैधरीत्या दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली माहिती आधारे पोलिसांनी सापडा रचुन आरोपीला रंगे हात पकडण्यासाठी गेले असता आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की करून समोर असलेल्या केशव चिटगिरे या शिपायावर चंक सत्तुर उगारला त्याच वेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी सावधगिरी बाळगून आरोपीला ताब्यात घेतल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही व त्याच्या जवळ असलेला दारूसाठा जप्त केला असून पुढील कार्यवाही पोलिस विभाग करीत आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

*स्वदेशी वापरा – देश वाचवा !* *आयुर्वेदिक वापरा – निरोगी रहा !*

जीर्ण इमारतीत विद्यार्थ्याचे ज्ञानार्जन माजी सभापती च्या पत्राला केराची टोपली

शंकरपूर- चिमूर तालुक्यात चिचाळाशास्त्री येथे जीर्ण व पडक्या इमारतीत विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू असून विद्यार्थ्याचे जीव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved