पक्षाला जर असं वाटत असेल की माझ्या ऐवजी मंगेश देशमुख हे निवडणूक जिंकू शकतात, तर…
नागपुर – काँग्रेसकडून ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयानंतर एबीपी माझाशी बोलताना रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी सांगितले की, “मलाही ते पत्र आता मिळालेलं आहे. मी ते पत्र वाचत आहे, त्यामुळे पक्षाने जर निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाला विरोध करण्याचं माझं काही कारण नाही. कारण, संसदीय बोर्डाने मला उमेदवारी देऊ केली होती. मी आज सहा वाजेपर्यंत प्रचारातच होतो, अनेक मतदरांच्या संपर्कात होतो. पण पक्षाने जर आता यावेळी निर्णय घेतलेला आहे. तो जरी माझ्या बाजूने नसला, तरी पक्षाला जर असं वाटत असेल की मंगेश देशमुख हे निवडणूक जिंकू शकतात, माझ्या ऐवजी तर त्या निर्णयला विरोध करण्याचं काही कारण नाही. माझ्याशी कुणी चर्चा केली नाही. मी कोणताही आरोप करणार नाही. कारण, काँग्रेस पक्षात येऊन मला जेमतेम १५ दिवस झालेले आहे. त्यामुळे त्यांनी जे मूल्यमापन केलेलं असेल, त्या मूल्यमापनाच्या आधारावर त्यांनी जर एखादा निर्णय घेतलेला असेल, तर त्या निर्णयाच्या विरोधात जाण्याचं माझं काही कारण नाही. मी दुपारपर्यंत प्रदेशाध्यक्षांशी बोलत होतो, तेव्हा त्यांनी देखील सांगतिलं की असा कोणताच विषय नाही. आता संध्याकाळी जर हा विषय आलेला असेल, तर त्यावर मी माझी प्रतिक्रिया एवढीच देईन की पक्षाचा जो काही निर्णय असेल, त्या निर्णयाविरोधात मी जाणार नाही. या निर्णयाने मला वाईट नक्की वाटेल, परंतु भाजपातून काँग्रेसमध्ये येण्याच्या माझ्या निर्णयावर मला पश्चाताप नाही.”