Breaking News

काँग्रेसला मोठा धक्का,या उमेदवारांच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

विशेष प्रतिनिधी-नागपूर

नागपूर:-काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी बुधवारी दिनांक २७ ला रामटेक मधुन लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. मंगळवारी (ता. २६) कोर्टाने यावर सुनावणी घेत रश्मी बर्वे यांना दिलासा देखील दिला होता. मात्र, आज जातपडताळणी समितीने त्यांचं प्रमाणपत्र रद्द केलं आहे.नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून रश्मी बर्वे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. बर्वे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. मात्र, ही उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचाही मुद्दा समोर आला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved