Breaking News

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार मावळते जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून ०५ सप्टेंबर रोजी स्वीकारला.डॉ. संजय कोलते हे यापूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कार्यरत होते. त्यापूर्वी उस्मानाबाद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्पूर्वी महाराष्ट्र रोजगार हमी योजना मुख्यालय नागपूर, येथे आयुक्त म्हणून त्यांनी काम केले आहे.

डॉ. कोलते यांना निवासी उपजिल्हाधिकारी धुळे पदावर कार्यरत असताना जनगणनेविषयक उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती रौप्य पदक मिळाले आहे. तसेच उस्मानाबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना पोषण अभियान 2018 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झाले आहे.1994 मध्ये राज्य प्रशासकीय सेवेद्वारे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जळगाव, नाशिक, धुळे, मुंबई, पुणे येथे विविध पदांवर काम केले. त्यानंतर त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved