jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
मोठ्या प्रमाणात वृक्षतोड कार्यवाही थातूर मातुर?
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर / चिमूर : – दिनांक. ०५/०३/२०२५ ला भिसी उपक्षेत्राअंतर्गत मौजा पारडपार शेतशिवारामध्ये अवैधरित्या तोड केलेल्या इतर किसम वृक्षापासुन निघालेल्या मालावर वनाधिकाऱ्याने जप्तीची कार्यवाही करुन वनगुन्हा नोंदविला.मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे मोजा पारडपार येथील शेतशिवारा अंतर्गत गट क्रमांक. १५० मौजा पारडपार शेतमालक प्रशांत गौतम वाघमारे यांच्या शेतामध्ये इतर किसम प्रजातीचे (कडुनिंब , किन्ही,आंजन, चिंच, पळस) काडया व खोडी पडलेल्या दिसल्या. आजबाजुला विचारणा केली असता शतमालक प्रशांत गौतम वाघमारे हे मौजा वडसा येथे राहतात व त्यांच्या शेतामध्ये अज्ञान सरदार (शिख) व्यक्तीने हा जलाऊ माल आनुन टाकला याची माहीती मिळाली.
त्या आधारे मौका स्थळाचा मौका पंचनामा करुन तिन बिट व तिन खोडी जमा करण्यात आली. जप्त केलेला माल भिसी मुख्यालय वाहतुक करुन COR No. ०१/२०२५ दिनांक. ०५/०३/२०२५ नुसार महाराष्ट्र वृक्षतोड (विनियमन) अधिनियम १९६४ चे कलम ३ व ४ अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास चालु केला आहे. सदर प्रकरणाचा तपास संतोष औतकर, राऊंड ऑफीसर, भिसी हे के.बी. देऊरकर वृक्षअधिकारी तथा वनपरीक्षेत्र अधिकारी चिमुर (प्रोेशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. प्रकरणाचा तपासा संबधाने आर.डी.नैताम वनपाल (सं.व.अ.नि) चिमुर, विलास कपाळे वनरक्षक भिसी, भानुदास बोरकर वनर्षक गडपिपरी पि.बी.आवळे, वनरक्षक (सं.व.अ.नि) चिमुर, जानबा नंदनवार, शुभंम बारेकर, जितेंद्र दडमल, यांनी सहकार्य केले.
अशाप्रकारे असंख्य मोठ्या प्रमाणावर वृक्षाची अवैधरित्या तोड केली असून थातूर – मातुर घटनास्थळ पंचनामा प्रादेशिक वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला दिसून आला आहे. घटनास्थळी पत्रकार यांनी मोठ्या प्रमाणावर जिवंत वृक्षाची तोड पाठातील तथा शेतातील वृक्ष तोडून असल्याचे चित्र उघळ्या डोळ्यांनी बघून सुद्धा जलाऊ लाकडाची पंचनाम्यामध्ये नोंद घेतली असून या अगोदर सुद्धा अशाप्रकारच्या घटना या क्षेत्रात बघावयास मिळाल्या असल्याने याचा संपूर्ण तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यायला हवा अशी स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे.