jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की मुंबईमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांनी शेवगाव शहरातील व ग्रामिण भागातील अतिक्रमण धारक टपरीधारकाचे तात्काळ पुर्नवसन शेवगाव शहरातील शासकीय भूखंड जागेत उपलब्ध करून द्यावे यासाठी भेटुन निवेदन दिले, यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार स यांनी तात्काळ दखल घेत अहिल्यानगर च्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनद्वारे सूचना करत शेवगांव शहरातील मोकळ्या शासकीय जागेचा प्रस्ताव तयार पाठवण्याच्या सुचना केल्या याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कपील पवार कार्याध्यक्ष संजय कोळगे आदी मान्यवर उपस्थित होते.
“वास्तविक अतिक्रमण मोहिमेत उधवस्त झालेल्या व्यवसायिकांचे प्राधान्याने प्रश्न सोडवणे हे काम विद्यमान लोकप्रदतिनिधींचे आहे तालुक्याचे आमदार खासदार पालकमंत्री यांनी प्रशासनाची तातडीची बैठकबोलावून परिस्थीतीचे गांभीर्य ओळखुन निर्णय घेणे क्रमप्राप्त होते पण तसे होताना दिसत नाहीं शेवगांव शहरातील सुमारे सातशे टपरीधारकांनाका जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*