jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात एका घरात धाड टाकून वरोरा पोलीसांनी तब्बल 1.750 किलो ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. शनिवारीला वरोरा शहरातील वडार मोहल्ला, यात्रा वार्ड येथील पोचमल्लु दांडेकर वय वर्षे 37 हा स्वतःच्या राहत्या घरी मनोव्यापारावर परिणाम करणारे घटक असलेला ओलसर कॅनॉबिस/गांजा वनस्पतीची पाने, फुले व बिया विक्रीकरिता ठेवत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली असता त्याच्या घराची झडती घेतली असता घरातून 1 किलो 750 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाक करणारे पदार्थ अधिनियम (एन.डी.पी.एस. ॲक्ट)1985 मधील कलम 8 (क), 20 (ब), आयआय (ब) एन.डी.पी.एस. ॲक्ट कायदा अन्वये वरोरा पोलीस स्टेशन येथे पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच या गुन्हयातील दुसरा आरोपी नामे रिजवान रंगरेज यास पोलीसांची चाहुल लागताच, पळून गेला असून तो फरार झाला आहे. पुढील कारवाई पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, दिपक ठाकरे, संदीप मुळे, विशाल राजुरकर, पोहवा मोहन निषाद, संदीप वैदय, दिलीप सुर, अमोल नवघरे, मनोज ठाकरे, महेश गावतुरे यांनी केली.