jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ :- पांढरकवडा केळापूर बायपास मार्गे शहरातून बेकायदेशीर अवजड वाहनांची सर्रास वर्दळ सुरू आहे,अनेक ट्रक,कंटेनर आणि अवजड वाहने टोल वाचवण्यासाठी या मार्गाचा गैरवापर करीत असल्यामुळे स्थानिक नागरिक,विद्यार्थी आणि पादचारी व रस्त्यावरील मुक्या प्राण्यांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. केळापूर बायपास मार्गे गावातून जाणारा रहदारीचा मार्ग जड वाहनांकरिता उपयुक्त नसून नुकताच चालबर्डी मार्गावरील रामदेव बाबा लेआऊट येथील हनुमान मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्देवी मृत्यु झाला,जड वाहनाने सायकलस्वाराला दिलेली धडक अशा अनेक घटनांमुळे स्थानिक नागरीकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ.प्रिती तोटावार यांनी पोलीस प्रशासन आणि जिल्हा वाहतूक विभागाकडे निवेदन देऊन त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे.या संदर्भात पांढरकवडा पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मी मेल्कुवार,एएसआय हरीदास मानकर,हेड कॉन्स्टेबल निवृत्ती कुळसंगे,महिला हेड कॉन्स्टेबल किरण पाटील,अलका कांबळे,मंजूषा मिलमीले यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने पावले उचलली जातील असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.