jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ :- झरीजामणी दिनांक ३ मार्च रोजी चिचघाट येथील पोलीस पाटील यांच्यावर लोखंडी रॉडणे जीवघेणा हल्ला केला. हल्ला झालेल्या पोलीस पाटिलचे नाव पंढरी अरुण डुकरे वय ३५ वर्षे असून हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोरेश्वर परसराम सरोदे वय ३८ वर्षे राहणार खडकडोह येथील आहे. पंढरी डुकरे हे भावाच्या शेतात मजुराला डबा देण्याकरिता जात असताना हल्ला करणारी व्यक्ती मोरेश्वर सरोदेने पंढरी डुकरे यांना अश्लील शिवीगाळ केली, या बदल विचारणा केल्यावर मोरेश्वर सरोदेने जीवे मारण्याची धमकी दिली. पंढरी डुकरे यांनी याकडे दुर्लक्ष करून आपल्या कामाला निघून गेले.परंतु आरोपी याने धमकवल्या प्रमाणे तो पंढरी यांची वाट पाहत होता.
सायंकाळी शेतातील मजुराला खडकडोह येथे सोडायला गेले असता मोरेश्वर हा आपल्या दुचाकीवर आणलेल्या लोखंडी रॉडणे सरळ पंढरी डुकरेवर चालून गेला व डोक्यावर वार केला. यात गंभीर दुखापत झाली तोच दुसरा वार चुकवला परंतु तो पंढरी डुकरे यांच्या पाठीवर बसला. वार एवढा घातक होता की पंढरी डुकरे हा जागीच बेशुद्ध झाला. या वेळेस पंढरी डुकरे यांच्या चुलत भावाने आरडा ओरड केल्याने आरोपी मोरेश्वर हा रॉड घेऊन तेथून पळून गेला. पंढरी डुकरे यांना त्यांच्या चुलत भावाने आपल्या वाहणात बसवून पोलीस स्टेशनला आणले व मेडिकल व उपचाराकरिता वणी येथे पाठवले. पुढील तपास मुकुळबन पोलीस करित आहे.