जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
भंडारा:- अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संजय चिंधुजी कदम ठाणे (मुंबई )यांची नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी एका लेखी पत्रकाद्वारे केलेली आहे .
संजय कदम हे 1989 पासून सांस्कृतिक क्षेत्रात नृत्य धडे शिकले. भारतीय लोककला पारंपारिक नृत्याचे प्रशिक्षण केले .भारतीय सांस्कृतिक नृत्य डिप्लोमा कोर्स सुद्धा केला .शाहिर संस्था या माध्यमातून नृत्याचे सादरीकरण केले. विविध देशात ,परदेशात नृत्याचे सादरीकरण करण्यासाठी दौरे केले. 1995 पर्यंत हा प्रवास सुरू होता .काही सादरीकरण महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाच्या कार्यक्रमास सादरीकरण केले .त्याचप्रमाणे विविध शाळेत जाऊन जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना नृत्याचे धडे व मार्गदर्शन केले. त्यांना खाऊ व शाळेतील वस्तू वाटप केले.
आदिवासी पाड्यात जाऊन त्यांना शाळेत लागणाऱ्या वस्तू व खाऊवाटप करून नृत्य शिकवले .तसेच अपंग ,मतिमंद ,बुद्धी असलेच या मुलांना शिकविले व वस्तूचे वाटप केले .सामाजिक बांधिलकी असल्याने लॉक डाऊन मध्ये काही क्षेत्रात काम करणारे कलाकार ,व्यक्तिवादक ,गायक , नृत्य, पडद्यामागे तंत्रे यांना रेशनिंग वाटप केले .अजूनही ते सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेने घेतली असून त्यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. पुढील कार्य अंध ,अपंग ,मुकबधिर, कर्णबधिर यांच्यासाठी करण्याचा त्यांचा माणस आहे.