मराठा बांधवांनो रस्त्यावरच्या लढाई बरोबरच कायद्याची लढाईही महत्त्वाचीच
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-राज्य मागासवर्ग आयोगाकडून होणाऱ्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणावर लक्ष केंद्रित करा* येणाऱ्या चार-पाच दिवसात राज्य मागासवर्ग आयोगा कडून प्रत्येक मराठा कुटुंबाचे व खुल्या प्रवर्गातील इतर घटकांचे शहरात व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणार आहे.हा सॅम्पल सर्वे नसून व्यापक स्वरूपाचे सर्वेक्षण होणार आहे. रस्त्यावरच्या लढाईसाठी आपण मराठा बांधव एकवटतो हे नक्कीच अभिमानास्पद आहे.याप्रमाणेच कायद्याच्या लढाईकडेही आपण दुर्लक्ष न करता गांभीर्याने पाहिले पाहिजे.
विघ्नसंतोषी सदावर्ते सारखे लोक कोणतेही मोठे मोर्चे न काढताही कोर्टात जाऊन अन्नात विष कालवतात,यातून बोध घ्यायला हवा.*सर्वेक्षणातील प्रश्नावली,खाचाखोचा आपल्या भोळ्या भाबड्या मराठा बांधवांच्या व्यवस्थित लक्षात न आल्यास कुटुंबाची माहिती देण्यात गफलत होऊ शकते.हे सर्वेक्षण शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सहभागातून होणार आहे.त्यांच्या नकारात्मकतेचा फटका मराठा समाजास बसू नये यासाठी मराठा कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे. म्हणूनच तातडीने सर्वेक्षणाबाबत सर्वांना जागरूक करण्यासाठी सर्व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जिल्ह्याला घेतली पाहिजे.
या बैठकीत सर्वांना सर्वेक्षणाची माहिती,प्रश्नावलीतील प्रश्नांची उत्तरे याबाबत मार्गदर्शन करायला हवे,यासाठी आवश्यकता असल्यास आपल्याकडे आम्ही मार्गदर्शक पाठवू.त्यानंतर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी गाव पातळीवरच्या प्रमुख कार्यकर्त्यांची तालुक्याच्या ठिकाणी मीटिंग घेऊन त्यांनाही असेच मार्गदर्शन करायला हवे व मग या प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मराठा बांधवांच्या घरोघरी जाऊन त्यांना जागरूक केले पाहिजे.सर्वांनी मनावर घेतल्यास हे फक्त दोन-तीन दिवसाचे काम आहे.मराठा समाजाचे सामाजिक,शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण निर्विवादपणे सिद्धकरण्याची हीच संधी आहे. पुढील १०वर्षे पुन्हा सर्वेक्षण होईल असे वाटत नाही.सर्वेक्षणावर लक्ष केंद्रित करून मराठा समाजाचा आरक्षणाचा पाया भक्कम करूया.रस्त्यावरच्या लढाईबरोबरच कायद्याची लढाई लढण्यासाठी कटीबध्द होऊया.
*ताजा कलम*
येत्या 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन ते तीन कोटी मराठा समाज बांधव मुंबई दर्शनासाठी जाणार आहे तेथील प्रसिद्ध मंत्रालय शेअर मार्केट फिल्मीस्थान चौपाटी मरीन ड्राईव्ह पाहणार आणि सार्वजनिक शौचालयाची सोय न झाल्यास या सर्व प्रसिद्ध ठिकाणी “हगनार” बेसावध राहून चालणार नाही चला मुंबई.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*