महसूल पथकाची धडक कारवाई
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
यवतमाळ:-राळेगाव तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहेत. काल १२ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता महसूल पथकाने अवैध वाळूची वाहतूक करतांना एक टिप्पर पकडला. हि कारवाई ऐन राळेगांवच्या तहसील कार्यालयापुढे करण्यात आली त्यामुळे बघ्याच्या भुमिकेत शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
तालुक्यांतून वाहणाऱ्या वर्धा नदी पात्रातून दररोज हजारो ब्रास वाळूचा अवैधरित्या उपसाकरून विविध प्रकारच्या वाहनाने अवैध वाहतूक केली जात आहे. महसूल प्रशासनासह पोलिस विभागाकडून सातत्याने कारवाया केल्या जात असल्या तरी अवैध वाळूची तस्करी बंद होण्याचे नाव घेत नाही. अशातच काल १२ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता दरम्यान महसूलचे पथक गस्तीवर असतांना एमएच २९ बी.ई. ४४५५ या क्रमांकाचा पाच ब्रास वाळू भरुन वडकी ते कळंब या राष्ट्रीय महामार्गाने भरधाव वेगाने जात होता. पथकाने त्या वाहनाचा पाठलाग करत राळेगांवच्या तहसील कार्यालयापुढे पकडून पंचनामा केला व पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केला.
ही कारवाई मंडळ अधिकारी महादेव सानप, तलाठी गिरीश खडसे यांनी केली. पुढील कारवाई तहसीलदार अमित भोईटे यांच्या मार्गदर्शनात सुरू असल्याचे मंडळ अधिकाऱ्यांनी सांगितले असुन सदर वाहन कोणाच्या मालकीचे आहेत हे मात्र कळू शकले नाहीत. कारवाई दरम्यान हि कारवाई दडपल्या जाते की काय हे पाहण्यासाठी राळेगांव येथील नागरिकांनी गर्दी केली होती.