इंदिरा नगरवासियांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकुल करून कायमस्वरुपी पट्टे द्या अन्यथा होनाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी चिमूर याना निवेदन देण्यात आले.चिमूर नगर परिषद क्षेत्रातील इंदिरा नगर ह्या वस्तीत १९७५ पासून गोर गरीब कष्टकरी कामगार कुटुंबासहित वस्ती करून राहत असून. शासकीय वाटपात मिळालेल्या प्लाटचे कायमस्वरुपी पट्टे नसल्याने शासनाच्या सर्व सवलतीचा लाभ मिळत नसल्याने इंदिरा नगर येथील रहिवासी शासनाच्या सर्व सोई सवलती पासून वंचित आहेत.
या संदर्भाने इंदिरा नगर येथील नागरिकांनी लेखी निवेदन व मोर्चे सुधा काढले आहेत. २०२२ ला तत्कालीन उपविभागीय अधिकारी प्रकाश संपकाळ यांनी कार्यालय मध्ये बैटक लाऊन उपविभागीय अधिकारी यांनी नगर परिषदला मोजणी फी भरन्याचे आदेश दिले होते. परंतु नगरपरिषद ने आदेशाचे पालन न केल्याने इंदिरा नगरचे सर्व रहिवासी शासकीय योजनेपासून वंचित आहेत.सन १९७५ पासून सदर जागेवर राहत असताना अजूनही सदर जागेचे पट्टे पट्टे धारकांना दिलेले नाही. तहसीलदार. नगर परिषद मुख्याधिकारी. मंडल अधिकारी. तलाठी हेतुपुरसपर दुर्लक्ष करीत असल्याने रहीवसियांच्या हक्कासाठी उपोषण व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार या निवेदनातून इंदिरानगर वासियानी केला असून या संदर्भाने आज उपविभागीय अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी कीशोर गाडगे याना दिलेल्या निवेदनात केला आहे. या वेळी नंदकिशोर अंबादे. प्रमोद गायधनी. संदीप करंडे. सुधाकर बारेकर. डॉ देव. रामभाऊ सोरदे. हरिदास अंबादे. सुलभा अंबादे. शहनाज शेख. राजू फुलबांधे. सोनाबाई शेलोरे. ज्योती राऊत. किरण भैसारे.व इतर इंदिरा नगर रहिवासी उपस्थित होते.