Breaking News

शेवगाव पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार तालुक्यातील गोरगरीब लाभार्थ्यांना त्याचा त्रास कार्यालयामध्ये सगळा प्रभारी कारभार जबाबदार कोण ??? महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार आंदोलन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव:-ता.10 फेब्रुवारी 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा कारभार तातडीने सुरळीत करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी पत्राद्वारे तहसीलदार प्रशांत सांगडे यांचेकडे केली आहे शेवगाव तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अंत्यत अनागोंदी कारभार सुरु असुन नविन रेशन कार्ड काढणे,रेशनकार्ड मध्ये नाव समाविष्ट करणे, व सर्वात महत्वाचे रेशनकार्ड ऑनलाइन करणे या कामासाठी नागरिकांची मोठी हेळसांड होत असुन नागरिकांना यासाठी पुरवठा विभागात महिनों महिने चकरा माराव्या लागत आहे. या कामासाठी अनेक महिला तसेच वयोवृद्ध नागरिक दिवसभर पुरवठा कार्यालयाच्या बाहेर बसून असतात. तसेच पिवळे रेशनकार्ड काढण्यासाठी ठराविक रक्कम घेऊनच पिवळे रेशनकार्ड दिले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांचे रेशनकार्ड ऑनलाइन असणे आवश्यक असल्याने अनेक नागरिक कित्येक दिवस यासाठी या कार्यालयात चकरा मारत आहेत. कार्यालयाला आजपर्यंत किती पिवळे रेशनकार्ड प्राप्त झाले व ते कोणास दिले गेले याची चौकशी झाली तर मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता असुन यावर जिल्हापुरवठा विभागाचे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येते.

मात्र या विभागाचे कामकाज सुरळीत होताना दिसत नाही. या सर्व कामासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या देखील तक्रारी आहेत. अनेक नागरिकांच्या या संदर्भात तक्रारी असताना देखील या कार्यालय प्रमुखाची या विभागातून बदली होत नाही हे विशेष आहे यासाठी कुठला सरकारी वरदहस्त पुरवठा विभागाला प्राप्त आहे हे समजण्यास मार्ग नाही असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.या विभागात आपण तातडीने फेरबदल करुन या विभागाचे कामकाज सुरळीत करावे. हा विषय आपल्या स्तरारील असल्या कारणाने या संदर्भात आंदोलन करण्याची वेळ आपण येऊ देऊ नये अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना पत्रानुसार करण्यात आली आहे.

*ताजा कलम*

*शेवगाव तालुक्याच्या स्वस्त धान्य वितरण व्यवस्था रेशन दुकानदार आणि पुरवठा विभाग यांच्या ताळमेळ नसल्याने गेले कित्येक महिन्यापासून ऑनलाइन रेशन कार्ड करणे व अंत्योदय लाभार्थी आणि प्राधान्य लाभार्थी यांना धान्य न मिळणे बंद आहे कार्यालय सगळा प्रभारी कारभार असल्यामुळे व तालुक्याला पूर्णवेळ पुरवठा निरीक्षक नसल्यामुळे जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था शेवगावकरांची झाली आहे*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved