Breaking News

चहांद येथे सोनामाता हायस्कूल चा इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ

यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून प्रामाणिक प्रयत्न करावेत-
ठाणेदार विजय महाले यांचे प्रतिपादन

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे

राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद,येथे दिनांक 15/02/2024, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थी दशेतच योग्य असे ध्येय निश्चित करून त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत असे प्रतिपादन विजय महाले, ठाणेदार वडकी यांनी सोनामाता हायस्कूल चहांद येथे केले. सोनामाता हायस्कूल चहांद येथील वर्ग 10 च्या निरोप समारंभाच्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तसेच मार्गदर्शक म्हणून ठाणेदार विजय महाले यांनी सायबर क्राईम या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद हायस्कूल वडकी चे चित्ते सर यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय व नोकरी याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनामाता शाळेचे मुख्याध्यापक अनिल धोबे सर होते. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक चिव्हाणे सर, कांबळे सर, राजेंद्र झोटिंग, दांडेकर सर, गोवारदिपे मॅडम, गावंडे मॅडम, देवानंद सोनोने, प्रथमेश राऊत, हे कर्मचारी उपस्थित होते. निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला वर्ग 5 ते 10 चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शाळेतुन उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून वर्ग दहावीची कु. गौरी वारकर हिची निवड करण्यात आली.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. वर्ग 10 च्या विद्यार्थ्यांनी निरोप देताना शाळेला भेटवस्तू दिल्या. विद्यार्थ्यांना आलेले अनुभव त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचलन सावंत सर तर आभार प्रदर्शन .शिवणकर सर यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved