उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिले निवेदन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर -:- मराठा समाजाला ओबीसीतुन आरक्षण देण्यात येऊ नये अशी मागणी विदर्भ तेली समाज महासंघ चिमूर तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या बेकायदेशीर व मागासवर्गीयावर अन्यायकारक असलेल्या निर्यानाचा विदर्भ तेली समाज महासंघने विरोध केला आहे.
असाधारण क्रमांक ४९ महाराष्ट्र अनुसूचित जाती. अनुसूचित जमाती. अधिनियम विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या पडताळनीचे विनियमन अधिनियम २०००. २६ जानेवारी या अधिसूचनेच्या मसुधा रद्द करण्यात यावा असी मागणी विदर्भ तेली समाज महासंघ तालुका चिमूरच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमूर यांचे मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, यावेळी ईश्वर डुकरे, प्रभाकर पिसे, भास्कर बावनकर, अशोक कामडी, अभय धोपटे, रामदास कामडी, संजय कामडी, श्रीहरी सातपुते, सुनिल हिंगणकर आदी उपस्थित होते.