Breaking News

सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणारे दाम्पत्य व संस्थेस अनुदानाची मान्यता

सामाजिक न्याय विभागाची कन्यादान योजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि.18 : विवाह सोहळ्यामध्ये अनाठायी खर्च करणे, त्यासाठी प्रसंगी कर्जबाजारी होणे व त्यामुळे आर्थिक समस्येच्या खाईत लोटले जाणे हे प्रकार टाळण्यासाठी महाराष्ट्रातील अनुसूचित जाती (नवबौध्दांसह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह) विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणा-या जोडप्यांना शासन निर्णय 2 फेब्रुवारी 2019 अन्वये कन्यादान योजना सुरू करण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये भाग घेणा-या मागासवर्गीय दाम्पत्यासाठी वस्तुरुपाने 20 हजार रुपये तसेच स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे 4 हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे, असे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved