Breaking News

संडे स्पेशल दणका – शहरातील रोड रोमियोंचा सडक संख्या हरींचा मोडला मणका

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील गजबजलेल्या बस स्थानक डॉक्टर आंबेडकर चौक मिरी रोड बाळासाहेब भारदे स्कूल परिसर न्यू आर्ट्स कॉलेज निर्मल ब्राईट च्या बाहेरचा भाग या भागात हल्ली घरच्या भाकरी खाऊन लोकांचे लेखीबाळींना त्रास देण्याचा उद्योग काही टुकार मोकार आणि आई बापाचे संस्कारहिंण पोर हायस्कूल जुनिअर कॉलेज व सीनियर कॉलेज व खाजगी क्लासला जाणाऱ्या लहान मुली युवती तरुणी यांना त्रास देणे पाठलाग करणे दमदाटी करणे लॉजवर येण्यासाठी बळजबरी करणे असे सर्रास प्रकार होताना दिसत आहेत.

परिसरातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालय यांनी याची गंभीर दखल घेऊन आपल्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे पिक अवर मध्ये पोलिसांची गस्त वाढविणे शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्या समन्वयाने संरक्षक दल स्थापन करणे काही अनुचित प्रकार लक्षात आल्यास त्याची तात्काळ माहिती संबंधित शालेय प्रशासनाला व पोलिसांना देणे याशिवाय या भामट्या लोकांचा बंदोबस्त होणार नाही.

*ताजा कलम*

“अलीकडच्या काळात या एकतर्फी प्रेमा मधून अनेक हाणामारीचे प्रसंग मिरी रोड आंबेडकर चौक बसस्थानक परिसर बाळासाहेब भारदे हायस्कूल परिसर या भागात झालेले आहेत शिक्षण घेणाऱ्या मुली व त्यांचे पालक भयग्रस्त व काळजी युक्त वातावरणात दिसत आहेत काही मुली सुद्धा आपलं शिक्षण बंद होईल या भीतीने काही प्रकार पालकांना घरी सांगत नाहीत यामुळे या भामट्या सडक सख्या हरींचं पावतो यांची वरात नग्न करून पोलिसांच्या दारात काढल्याशिवाय यांची पाचवर धारणा बसणार नाही बाकी तुम्ही शेवगावकर सुज्ञ आहात”

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध …

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved