विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960052755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की येत्या 19 फेब्रुवारी 2024 सोमवाररोजी साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीमार्फत शेवगाव शहरांमध्ये भव्य कार्यक्रमांचे व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे यामध्ये 18 फेब्रुवारी रविवारी दुपारी तीन वाजता खंडोबा मैदान येथे छत्रपती केसरी जंगी हगाने चे आयोजन केले आहे 19 फेब्रुवारी 2024 रोजी सोमवारी सकाळी नऊ वाजता संत गाडगेबाबा महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान पारंपारिक वाद्य वाजवून शिव प्रतिमेची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.
त्याच दिवशी सकाळी 11 वाजता स्वराज मंगल कार्यालय आखेगाव रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर सायंकाळी सात वाजता क्रांती चौक शेवगाव येथे बसस्थानकासमोर भव्य आतिषबाजी आणि शिवरायांच्या आरती चे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानंतर दिनांक 20 फेब्रुवारी व 21 फेब्रुवारी बुधवार 2024 रोजी मंगळवार दुपारी दोन वाजताछत्रपती चषक भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे 22 फेब्रुवारी 2024 वार गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता शिवव्याख्याते शिवरत्न शेटे सर यांचे शिवशंभू पिता पुत्र यांच्या अतीरमणीय भावबंध या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
*ताजा कलम*
*शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरातील सर्व प्रमुख राष्ट्रपुरुषांचे चौक सजवण्यात आले आहेत सर्व शेवगाव शहर भगवे मे करण्यात आले आहे भगव्या पताका शिवरायांचे छवी असलेले झेंडे आदींनी शहर सजले आहेत शेकडो शिव मावळे या कामी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती शेवगाव शहर यांनी शहर व तालुक्यातील लोकांना व शिवभक्तांना या सर्व उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*