शेवगाव शहराला शेअर मार्केटचे ग्रहण… कोट्यावधी रुपयांची फसवणूकीची शक्यता???
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-दिनांक 16 फेब्रुवारी 2024 याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहर तसेच ग्रामीण भागात सुद्धा शेअर मार्केट चा बोलबाला खूप चर्चेत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर मार्केट मधील कोणतेही ज्ञान नसणारे लोक इथे, शेतकरी, व्यापारी वर्गाची पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवताने दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून या भागात शेअर मार्केट मधून सातत्याने चांगला नफा मिळवून देणाऱ्या कंपन्या सक्रिय आहेत, त्याच पार्श्वभूमी वर आता मात्र खूप मोठया प्रमाणावर अगदी बाहेरील जिल्ह्यातूनही अनेक फसव्या कंपन्या शेवगाव मध्ये दाखल झाल्या असून महिन्याला 15-20% पर्यंत नफा मिळवून देण्याचे अमिश दाखवत करोडो रुपये जमावत आहेत. ग्राहकांना विश्वास संपादित करण्यासाठी अनेक प्रकारचे अग्रीमेंट, तसेच चेक देखील दिले जातात, परंतु मुळात फसवणूक झाल्यावर कोणतीच गोष्ट कामाला येत नाही.
शेवगाव मध्ये गुंतवणूक दारांनी आता वेळीच सावध होणे गरजेचे आहे, अनेक तज्ज्ञ यावर बोलून बोलून थकलेत कि शेअर मार्केट मधून शास्वत 15-20% नफा मिळणे अशक्य आहे, अश्या अनेक कंपन्या आजपर्यंत बंद पडल्यात आणि गुंतवणूक दारांचे हजारो कोटी रुपये बुडालेत. फक्त जाहिरात बाजी करून पैसे गोळा करणे हाच यांचा व्यवसाय आहे, काही कंपन्यानी तर महाराष्ट्र भर शाखा चालू केल्याची चर्चा आहे. जर गुंतवणूक दारानी वेळीच सावध झाले नाही तर KBC आणि पल्स ची पूनरावृत्ती परत एकदा बघायला भेटेल यात शंकाच नाही. महिन्याला 15-20% येतातच कसे या प्रश्नामुळे प्रशासन आता खडबडून जागे झाले आहे आणि या सर्व कंपन्याचे लवकरच प्रदाफाश झाल्याशिवाय राहणार नाही. प्रशासकीय स्तरावरून लवकर या कंपन्याना नोटीसा काढून मार्च अखेरीपर्यंत सर्वांची चौकशी होईल असे गोपनीय सूत्रमार्फत सांगण्यात आले.
*विशेष बाब*
*काहींनी वावर विकले काहींनी सोनं विकलं काहींनी काम धंदा सोडून दिला व्याजाने पैसे काढून कंपनीत गुंतवले बँका पतसंस्था आणि खाजगी सावकाराकडून मुदत ठेव पावत्या मोडून पैसा गुंतवला शेवगाव ची संपूर्ण बाजारपेठ बकाल झाली आहे काम नाही धंदा नाही आईतखाऊ पणा वाढला आहे*
*ताजा कलम*
शेअर बाजारामध्ये कायम नफा आणि तोटा होत असतो त्यामुळे शेअर मार्केट अस्थिर असते आपण नेहमी वृत्तपत्र आणि समाज माध्यमातून शेअर इतक्या लाख कोटींनी गडगडले काही लोक देशोधडीला लागले काही रात्रीतून अब्जाधीश झाले अशा बातम्या ऐकतो परंतु दर महिन्याला फिक्स इनकम देणाऱ्या कंपन्या शेवगा शहरात आल्याने हा पैसा नक्की शेअर मार्केटमध्ये जातो का की त्या नावाखाली फक्त टोप्या फिरवण्याची काम सुरू आहे अशी शंका येऊ लागली आहे मला एक नमुना म्हणाला साहेब दहा लाख रुपये गुंतवा तुम्हाला दर महिन्याला 80 हजार रुपये आणून देतो मी त्याला एकच प्रश्न विचारला मला जगातली अशी एक कंपनी दाखव जि दर महिन्याला फक्त नफ्यात असते कधीच तोट्यात नसते मग मी तुझ्याकडे दहा लाख का एक कोटी रुपये गुंतवतो या प्रश्नावर तो निवृत्त झाला या कंपन्यांनी रात्रीतून कुलूप लावलं शेकडो लोकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही पेट्रोल भरताना स्लिप मिळते कशा पद्धतीच्या गुंतवणुकीच्या पावत्या दिल्या जातात एक वेळ “बाबा गेल्या आणि दशम्याही गेल्या” अशी अवस्था होऊ नये शहरातील तालुक्यातिल गुंतवणूकदारांची अवस्था “तेल गेलं आणि तूप गेलं हाती धुपाटन आलं” अशी अवस्था गुंतवणूकदारांची होऊ नये हीच या निमित्ताने देवाकडे प्रार्थना
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*