Breaking News

१८ ला भंडारा जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धा

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ग्रिको रोमन सब ज्युनिअर व वरिष्ठ ग्रिको रोमन (पुरुष) निवड चाचणी कुस्ती स्पर्धा दिनांक २० ते २२ फेब्रुवारी २०२४ ला कात्रज पुणे येथे होत असलेल्या कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व वरिष्ठ पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी भंडारा जिल्हा कुस्तीगीर संघाची निवड चाचणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे रविवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.

ही निवड चाचणी भंडारा जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास शहारे, सचिव महेश शहारे, कोषाध्यक्ष अशोक बन्सोड व जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लतिका लेकुरवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

त्यात सब ज्युनिअर विभाग वजन गट १७ वर्षाखालील ४५, ४८, ५१, ५५, ६०, ६५, ७१, ८०, ९२ व ११० किलो वजन गटात राहणार आहे. जन्मतारीख २००६ व २००७ असावी. जन्मतारीख २००८ असेल त्यांनी पालकाचे संमतीपत्र व वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला आणावा. वरिष्ठ ग्रिको रोमन (पुरुष) वजन गट ५५, ६०, ६३, ६७, ७२, ७७, ८२, ८७, ९७ व १३० किलो. ग्राम वजनापर्यंत होणार आहेत. तसेच जन्मतारीख २००४ पूर्वीची असावी. जर २००५ असेल तर पालकाचे संमतीपत्र व वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला आणावा.

तरी भंडारा जिल्ह्यातील ग्रिको रोमन कुमार व वरिष्ठ ग्रिको रोमन पुरुष पेहलवानांनी आपले आधार कार्ड घेऊन वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन भंडारा जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे प्रशिक्षक कुस्ती प्रशिक्षक अशोक बन्सोड व विलास केजरकर यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सुधीर मुनगंटीवार साठी लाडक्या बहिणी बनल्या रणरागिणी

*मविआच्या स्टंटबाजीला कोसंबीतील महिलांचे आक्रमक प्रत्युत्तर, हल्लेखोरांची पळापळ* *‘लाडकी बहीण’ हिट झाल्याने मविआचा रडीचा डाव* …

बस! मतदान करा आणि जिंका एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल

मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे आकर्षक बक्षीस योजना जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : लोकशाही प्रक्रियेमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved