“चिमूरच्या घोडा यात्रेला सुरुवात”
“दिनांक २२/०२/२०२४ ला रातघोडा रथयात्रा”
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-संपूर्ण विदर्भासह भारतातील पवित्र श्रद्धास्थान असलेल्या श्रीहरी बालाजी महाराजांच्या घोडा यात्रेला सुरुवात झाली आहे. रथावर असलेल्या घोड्यावर बसून भगवान श्री कृष्णाची मूर्ती भक्तांसाठी महत्त्वाची मानली जाणारी प्रतिकृती नगरी ‘रातघोडा’ म्हणून ओळखली जाते. २२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजता हा महोत्सव सुरू होणार आहे. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. रात्रभर शहरात प्रदक्षिणा केल्यानंतर हा रथ बालाजी मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवला जातो.महाशिवरात्रीपर्यंत भाविकांना या रथाचे दर्शन घेता येणार आहे.
हा उत्सव ३९७ वर्षांपासून साजरा करण्यात येतो. श्रीहरी बालाजी महाराज देवस्थान ट्रस्टने उत्सवाच्या आयोजनाची तयारी पूर्ण केली आहे. यात्रेदरम्यान होणाऱ्या यात्रेची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी १० वी आणि १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षाही २२ फेब्रुवारीपासून सुरू होत असल्याने नेहरू विद्यालयात सुरू असलेली जत्रा तलावाच्या वरच्या टोकाला हलवण्यात आली आहे.