Breaking News

चिमूर तालुका शिवसेना तर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-संपुर्ण भारताचे आराध्य दैवत रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून चिमूर तालुका शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन चिमूर विधानसभा उपजिल्हा प्रमुख प्रशांतभाऊ कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जेष्ठ शिवसैनिक भाऊराव ठोमरे व जेष्ठ शिवसैनिक देविदासजी गिरडे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवसैनिक संदिप उरकुडे यांच्या मार्फत उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले असून शिवप्रतिमा भेट देण्यात आली. चिमूर येथील शिवाजी चौकात राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुजा अर्चणा करुन शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत संपूर्ण चौक गाजवला.

 

शिवसेना कार्यालयाचे उद्घाटनानंतर लगेच शिवभक्त शिवसैनिक व नागरिकांसाठी आलुभात वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेना शहर प्रमुख नितीन लोणारे,चिमूर तालुका संघटक रोशन जुमडे,उपतालुका प्रमुख केवलसिंग जुनी,विधानसभा संघटक प्रकाश नांन्हे,उपतालुका प्रमुख संजय वाकडे, उपतालुका प्रमुख किशोर ऊकुंडे, विभाग प्रमुख भैय्या कारेकर,मनोज तिजारे, उपतालुका प्रमुख राजेंद्र जाधव, विभाग प्रमुख आंबोली समिर बल्की, शिवसैनिक रमेश मेहरकुरे, प्रसिद्धी प्रमुख सुनिल हिंगणकर व अन्य शिवसैनिक, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला भानुसखिंडीचा बछडा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील भानुसखिंडी वाघिणीचा बछडा शिवा अखेर वनविभागाच्या जाळ्यात अडकला …

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved