Breaking News

बालकांना भोजनदान करून केला शिवरायांचा जन्मदिवस साजरा

टायगर ग्रुपचां चिमूर तर्फे शिवजयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने बालकांना भोजनदान करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुकबधीर विद्यालय येथे साजरी करण्यात आली,टायगर ग्रुप चिमूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने डिजे संस्कृतीला बाजूला ठेऊन शिवरायांच्या विचारांना अनुसरून अगदी साध्या पद्धतीने शिवरायांची जयंती साजरी केली. शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मुक बधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

तर व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सहचिटणीस श्रीहरी सातपुते. टायगर ग्रुप चिमूरचे शहर अध्यक्ष रोहन नन्नावरे. सुनिल हिंगणकर. अक्षय नागरीकर. अक्षय लांजेवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मूक बधिर विद्यार्थ्यांना श्रीहरी सातपुते.रामदास कामडी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुलाना चॉकलेट व भोजनदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन भूपेश गरमडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विकास जांभुळे. पवन झाडे. विशाल शेंडे. निखिल गिरी यांनी अथक परिश्रम घेतले

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शासकीय सहकार व लेखा पदविका परीक्षा 24 ते 26 मे दरम्यान

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागातर्फे घेण्यात येणारी शासकीय सहकार व …

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved