येत्या पावसाळ्यात शेवगाव शहराची होणार “तुंबापुरी” पावसाळा पूर्व नालेसफाईला नगरपरिषद आरोग्य विभागाकडून दिरंगाई
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे शेवगाव शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील गटारीवर केली व्यापाऱ्यांनी अतिक्रमण मुख्य बाजारपेठेतील गटार शोधून दाखवा आणि एक हजार रुपये बक्षीस मिळवा *काहींचे आधीच अतिक्रम त्यात म्हणतात गटारही माझ्या बापाची व्यापाऱ्यांची नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वापरतात उद्धट भाषा* शहरातील सर्व प्रमुख राज्य महामार्ग आणि मुख्य बाजारपेठ येथील गटारी वर्षभर तुंबलेले असतात हॉटेल व्यवसाय करणारे त्यांची घाण कापड व्यवसाय करणारे त्यांचे प्लास्टिक आणि इतर व्यवसाय करणारे त्यांचे टाकाऊ साहित्य झाडूने गटारीत लोटून मोकळे होतात काहींनी त्यावर पायऱ्या बनवल्या आहेत तर काहींनी चक्क बांधकाम करून ओटा बनवला आहे मुख्य बाजारपेठेत मुलांची जिल्हा परिषद शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे जैन गल्ली भागात सुद्धा गटारीचे घाण पाणी कायम रस्त्यावर असते *पायी चालणारे लोक बदकासारखे उड्या मारत चालत असतात* शेजारच्या दुकानदारांनी गटारच गायब केली आहे त्यामुळे या भागात कायम पाणी साचून दुकानांमध्ये पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे बाजारपेठ बस स्थानक परिसर नेवासा रोड शौकीन हॉटेल परिसर या भागात निम्मे शहराचे पाणी उतारामुळे येत असल्याने दरवर्षी या भागातील व्यापाऱ्यांना आणि शहरातील सगळ्यात मोठी गटार वल्लभदास लड्डा धर्म शाळेच्या मागच्या बाजूला आहे परंतु नव्याने झालेल्या अतिक्रमण या भागातील व्यापाऱ्यांना त्रास दहोत आहे.
पायी चालणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो शेवगाव नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने सगळा कारभार “आंधळ दळतंय आणि कुत्रे पीठ खातय” असा झाला आहे. अवकाळी पावसात शेव व शहराची झालेली दैना पाहता जून महिन्यात होणाऱ्या मोठ्या पावसामुळे { शहराची वाताहत } मुंबापुरी होणार आहे शहरातील गटारे काढताना सुद्धा मोठमोठे व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी त्यांचे नगरपालिकेतील स्थानिक केले चपाती घेत असतात गेल्या पाच वर्षापासून नगरपालिकेला नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद नसल्यामुळे जुन्यातीलच काही तिथे जाऊन काम ढवळाढवळ करतात आणि इकडे बाहेर भेटला सांगतात आमचा नगरपालिकेचा काही संबंध नाही पालिकेत कायम येरझाऱ्या हेलपाटे मरणारांनी तरी पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पावसाळापूर्व नालेसोपायच्या संदर्भात काय तीर मारले याची साधी चौकशी करण्याची सुद्धा कष्ट कोणी घ्यायला तयार नाही.
*ताजा कलम*
सुमारे दोन कोटी वीस लाख रुपयांचा घनकचऱ्याचा ठेका देऊ नाही म्हणावे अशी शेवगा शहर स्वच्छ आणि सुंदर दिसत नाही अनेक ठिकाणी उकांडे साचलेले आहेत “रत्नप्रभाचा” ठेकेदार कंपनीचा प्रकाश कुठेही पडताना दिसत नाही काही भागात घंटागाडी सकाळी आठ वाजता येते काही भागात त्याचे वेळापत्रक नाही तर काही भागात चार चार दिवसांनी येते या सर्वांचे नियोजन कोण करते याची सखोल चौकशी झाली पाहिजे
{ क्रमशः }
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*