Breaking News

पैसा असला की प्रकरण कसे सहज दाबता येते

व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा विना क्रमांकाची गाडी मध्य धुंद अवस्थेत जबाबदार कोण ???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर, भ्रष्ट पोलिस भ्रष्ट व्यवस्था भ्रष्ट प्रशासन भ्रष्ट राजकारणी भ्रष्ट व्यावसायिक भ्रष्ट एक्साईज विभाग भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे.
जर नियमाप्रमाणे पब बंद असते जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती जर नियमाप्रमाणे शोरुमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती,  जर नियमाप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोरं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती.. ऐरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स, पियुसी जवळ नाही म्हणून ट्राफिक पोलिस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिश्याचे लचक तोडतात. मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळतेय हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही.?  वरुन मागच्या दाराने पोलिस ज्याने दोघांना चिरडलं, २ कुटुंब उध्वस्त केली अश्या नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी पिझ्झाबर्गर पुरवतात…आपल्याहातून २ जणं मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा. मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराणा पेश करावा तसा जामिन मंजूर होतो. अशी भावना आहे
दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षिस द्यावं तसा जामिन दिला, त्यात अट काय तर३०० शब्दांचा निबंध लिहीण्याच मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याच १५ दिवस वाहतूकीचे धडे गिरवण्याची…यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे…इथे २ पोरं मेली…  विदाऊट लायसन्स गाडी चालवल्यास ३ महिने तुरुंगवास अल्पवयीनाने वाहन चालवल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास
मद्यपान करुन वाहन चालवल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास ओव्हरस्पिडींग असल्यास १ महिन्याचा तुरुंगवास अहो साधं रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास केला तरी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथें १५ तासात जामिन…वा…. यात निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो हे तर भयंकर आहे. पुणेकर न्यूज/ pune mirror च्या दाव्यानुसार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हेच ते नेते आहेत ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शीनी तो हाणून पाडला.  हे खरं असेल तर अश्यांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी. मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही… पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं.. म्हणून आपण बोललं पाहीजे… निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं.. तडकाफडकी मिळालेल्या जामिनाची पुणे पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. तसच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आऱोपीवर कठोर कारवाईच्यासुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसच पोलिस स्टेशनमधलं सीसीटीव्हीही तपासण्याचे आदेश दिलेयत. कारवाई होईल, न्याय मिळेल ही अपेक्षा !!! पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने आपली आलीशान गाडी भरधाव वेगाने चालवत अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा ( रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण तरुणीला चिरडले.
वेदांत अगरवाल विरोधात गुन्हा ही दाखल झाला. परंतु सर्व sections bailable होते त्यामुळे त्याची तत्काळ जामीनावर सुटका करण्यात आली. परंतु हे प्रकरण दाबण्याचा कसा प्रयत्न झाला, कोणी काय भूमिका घेतली ? शहरातील नाईट कल्चर आणि नाईट लाईफ हादरवून टाकणार्या घटनेचा हा Ground Report. नुकतीच 12 वी झालेला वेदांत शनिवारी रात्री मित्रांसोबत graduation party करण्यासाठी गेला होता. जाताना वडीलांची (विशाल अगरवाल) यांची आलीशान Porsche car घेऊन तो मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंटमध्ये गेला. शहरातील बड्या उद्योजकांच्या 60 ते 70 मुलांनी Cosie restaurant मध्ये दारु ची पार्टी केली. त्यानंतर वेदांत आणि त्याचे ठरावीक मित्र Marriott suits मधील Black नावाच्या पबमध्ये गेले. Black मधील पार्टी संपवून वेदांत ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि ड्रायव्हरला शेजारी बसवले. त्याचे दोन मित्र देखील गाडीत मागे बसलेले होते. दारूच्या नशेत वेदांत ने गाडीचा स्पीड वाढवला , ट्रम्प टाँवर समोर आल्यानंतर त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने समोरच्या पल्सरला धडक दिली. त्यांनंतर एका स्वीफ्ट कारला धडक दिली.
Ballr पब मधील स्टाफ ने घटनास्थळी धाव घेतली. यातील काही प्रत्यक्षदर्शींनी स्कूपला दिलेल्या माहितीनूसार ही धडक एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवर च म्रुत्यु झाला. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हाँस्पीटलमध्ये नेले, परंतु हाँस्पीटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही म्रुत्यु झाला. या दोन्ही तरूण तरूणी कडे कोणाचेही लक्ष नव्हते. आमदार सूनील टिंगरे यांनी अगरवाल यांची बाजू मांडण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. सुरूवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला. तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हीट अँण्ड रन केसप्रमाणे ड्रायव्हर ला ही उभे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरूणीची बाजू मांडली. गाडी वेदांत च चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हीडीओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले. येथे कारवाई चा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी आँफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी वेदांत अगरवाल विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. बर्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून , आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स Bailable असल्यामुळे वेदांत चा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मुंढव्यातील Cosie restaurant आणि Merriott suits मध्ये अल्पवयीन मुलांना दारु विक्री केली जात असूनही कारवाई का झाली नाही.? येथील cctv footage तपासले तर भयानक चित्र समोर दिसेल . Excise department ने याबाबत काय कारवाई केली?
दोन जणांचा जीव गेल्यानंतरही एफ. आय. आर. मध्ये Bailable Sections का दाखल करण्यात आले?अपघातात म्रुत्यु झालेल्या मुलांच्या आई वडिलांची Flight Miss झाली. त्यांना by road येण्यासाठी लागणारा वेळ आणि होणारी घालमेल याची दखल कोण घेणार ?

*ताजा कलम*

*रात्रभर पार्टी करून पहाटे दोघांच्या म्रुत्युस कारणीभूत ठरलेल्या वेदांत अगरवाल याला आई वडील crocin घेऊन आले होते, परंतु पोटच्या मुलांचे म्रुतदेह घरी घेऊन जाताना ‘त्या दोघांच्या’ आई बापाची काय अवस्था असेल?
Saturday night enjoy करणाऱ्या अल्पवयीन मुलांना सर्रास दारु serve करणाऱ्या रेस्टॉरंट विरुद्ध पोलीस आयुक्त काय कारवाई करणार संबंधीत आलीशान गाडी विशाल अगरवाल यांच्या नावावर रजिस्टर आहे . मार्चमध्ये या गाडीचे रजिस्ट्रेशन झाले असले तरी आरटीओ कडून अद्याप नंबर दिला गेलेला नसल्याचे समजते. तरीही ही गाडी रोडवर कशी येते ? याबाबत काही कारवाई होणार का ?*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सध्या जॉब च्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत.याचाच फायदा या पुण्यातील टोळीने घेयला सुरु केले आहे

*जनहितार्थ* विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :-सगळ्यांलाच चांगला जॉब वेळेवर भेटत नाही यामूळ तरुण …

केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved