जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय अंतर्गत चालक प्रशिक्षण केंद्र येथील कार्यक्रमात भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बीजू गवारे यांनी कामगार कायदे व पर्यावरण विषयी मार्गदर्शन करतांना पर्यावरण रक्षणार्थ किमान एक झाड लावून जगविण्याचा संदेश उपस्थित एस. टी . विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. तसेच एल .ओ. सी. एल.च्या वतीने डिझेल लुब्रिकांट ह्यांडलिंग व डिक्याटिंगबाबद मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विधिसेवा प्राधिकरण अंतर्गत मुख्य विधी सेवा संरक्षण अधिवक्ता भारत गभने यांनी श्रमिक कायदे अंतर्गतकामगारांना सुरक्षा प्रदान करण्याची कायदेशीर तरतूद आहे मात्र कामगार न्याय हक्काच्या लढाईत सहभागी होण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव बीजु गवारे हे होते तर वक्ता म्हणुन मुख्य विधी सेवा संरक्षक अधिवक्ता भारत गभने हे होतें , तसेच मोहन हूनरी . वरिष्ठ विक्री अधिकारी, विलास दिग्रसे भंडारा एस. टी .
विभाग नियंत्रक, तनुजा अहिरकर, यंत्र अभियंता महेंद्र नेवारे, विभागीय वाहतूक अधिकारी, शीतल शिरसाट, कामगार अधिकारी पराग शंभरकर, सुरक्षा व दक्षता अधिकारी, मोहन कानफाडे, भांडार अधिकारी,
लेखा अधिकारी नागपुरे ,उईके, कर्मचारी वर्ग अधिकारी घुई प्रामुख्याने उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे संचालन कामगार अधिकारी पराग शंभरकर यांनी केले. यावेळी मोठया संख्येने राज्य परिवहन मार्ग महामंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.