Breaking News

आम आदमी पार्टी तर्फे चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबीर

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षणाचा व योग्य करिअर मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे क्षमता-प्रतिभा असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थी हा नेहमीच मागे राहिला आहे. विद्यार्थी व पालकांची ही समस्या ओळखून करिअर विषयक योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी दि. १० जून रोजी सकाळी गुगल मिटवर ऑनलाइन करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. करिअर मार्गदर्शन शिबिरात सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री विक्टर फ्रान्सीस व डॉ.अजय घनश्यामची पिसे हे मार्गदर्शन करणार आहेत. दहावी, बारावी पास झाल्यानंतर चांगले करिअर कसे निवडावे, भारताबाहेर मोफत शिक्षणाच्या संधी यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शन शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आम आदमी पार्टी चे जिल्हा संयोजक मयूर रुईकर, जिल्हा सचिव किशोर पुसलवार, जिल्हा संघटक डॉ. अजय पिसे, परमजीत सिह झगडे, प्रशांत सिदुरकर, राजूभाऊ कुडे, योगेश सोनकुसरे, आदित्य पिसे, विलास दिघोरे, विशाल इंदोरकर, प्रवीण चायकते, मुकेश मसराम, प्रमोद भोयर, यांनी केले आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved