Breaking News

सेल्फी व्हिक्टरीचा, तुमच्यासाठी धोक्याचा सायबर भामट्याचा नवा सापळा – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे: पूर्वीच्या मोबाईलमधील फ्रंट कॅमेरा म्हणजे सेल्फी मोड साईडचा याची लेन्स तितकी अप टू द मार्क नसल्याने फोटो फारसे चांगले (शार्प) येत नसत. मात्र वरचेवर तंत्रज्ञानी ती उणीव कमी करत करत आताचे मोबाईल इतके टॉप एन्ड लेन्स सारखे केलेत की सेल्फी मोडवरही फोटो अगदी सुस्पष्ट (शार्प) येतात. त्यामुळे अनेकांना विशेषत तरुणाईला खूप आनंद झाल्याचे दिसते. मात्र हे मॉडर्न कॅमेरे तुम्हाला आनंद देणार असले तरी सायबर भामट्यासाठी नवीन एक संधी मिळाली आहे.तुम्हाला जाळ्यात अडकवून लुटायची. पार अगदी तुमचा मोबाईल, तुमची गॅलरी, तुमचे बँक अकाउंट सगळं सगळं भामटा एका क्षणात लंपास करू शकणार आहे. तरी ती पद्धत कशी आहे आणि “व्हिक्टरीची खूण करत काढलेल्या सेल्फीमुळे नेमका धोका काय होतो ते पाहूया, तुम्ही जेव्हा व्हिक्टरी खूण करत सेल्फी काढता न तो नुसता काढत नाही तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही टाकता. मित्रमंडळी तुम्हाला लाईक्स / कॉमेन्टचा आहेर देतात. तुम्हीही खुश होता. मात्र सायबर भामटे पण आता सोशल प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर आलेत. ते अशा “व्हिक्टरी” सेल्फी फोटोच्या शोधातच असतात. तुम्ही काढलेला तो तुमचा व्हिक्टरी फोटो त्यांना सापडला की तो ते त्यांच्याकडे डाउनलोड करून घेतात. आणि अतिशय प्रगत अशा “ए आय” सॉफ्टवेयरच्या मदतीने तुमच्या व्हिक्टरी खूण करतानाच्या बोटांवरील रेषा (फिंगर टिप्स) स्पष्टपणे ते सॉफ्टवेयर फोटोतून बाहेर काढून (एक्स्ट्रॅक्ट करून) फक्त स्वतंत्र अशी फिंगर प्रिंट तयार करते. अशा रीतीने एकदा तुमची फिंगर प्रिंट त्या लोकांना मिळाली की., त्याच्या मदतीने ते अनेक ठिकाणी गैरकानूनी पद्धतीने वापर करून तुम्हालाच गोत्यात आणतात.

ते धोके कसे असू शकतात त्याचे थोडक्यात सांगतो. तुमचा फोन चोरला जाऊन नंतर तुमच्याच त्या फिंगरप्रिंट च्या मदतीने तुमचा फोन अनलॉक केला जातो. (शेकडा ९०% लोक अंगठा अथवा पहिले बोट फिंगर लॉक साठी वापरतात असे आढळले आहे आणि थोडे सजग असलेले लोक मधल्या बोटाचा वापर करतात.) म्हणजेच सुमारे ९५ लोक संकटात येऊन या नव्या सापळ्यात सहज अडकू शकणार आहेत.एकदा का तुमचा फोन अनलॉक केला की त्यातला सगळा डेटा ते लोक चोरणार व त्यातूनच तुम्हाला संकटात टाकणार अथवा गॅलरीचे फोटो चोरणार आणि त्याचे मॉर्फिंग करून तुम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करून पैसे उकळले जाणार. जिथे जिथे सिक्युरिटी म्हणून एंट्रन्स गेटवर बायोमेट्रिक लॉक आहेत जिथे तुमची फिंगरप्रिंट स्टोअर आहे, तिथं ते भामटे तुमच्या नकळत सहजपणे आत शिरून तुमच्या कार्यालयीन कामातली महत्वाची माहिती पळवून नेऊ शकतात. काही बँकांमध्ये कॅशियर समोरची गर्दी कमी व्हावी म्हणून एटीएम सारखे मात्र त्याला बायोमेट्रिक लॉकिंग सिस्टीम असलेले यंत्र ठेवलेले आहेत. तिथं भामटे मंडळी तुमच्याच डुप्लिकेट तयार केलेल्या फिंगर प्रिंटचा वापर करून तुमच्या खात्यातून पैसे पळवू शकतात आणि अशा केसमध्ये नंतर तुम्ही बँकेत तक्रार करायला गेला तरी बँकवाले ती स्वीकारत नाहीत कारण फिंगरप्रिंट तुमचेच आहेत, असं ते म्हणणार.मुळात एक तर असे व्हिक्टरी खुणेचे फोटो काढलेच तरी ते सोशल मीडियावर टाकू नका. समजा टाकायची इच्छाच असेल तर फोटो एडिटर अथवा तत्सम फोटो इफेक्ट द्वारे फिंगर टिप्स एरिया ब्लर करा. म्हणजे मित्रांना “व्हिक्टरी” तर जाणवेल व भामट्याला शार्प फिंगर टिप्स तिथं न मिळाल्याने ते तुमचा नाद सोडून देतील. आता यापूर्वी कधी असे फोटो तुम्ही काढून सोशल वर टाकले असतील तर ते चेक करा. आणि जमलंच तर डिलीट तरी करा किंवा बोटांचा एरिया ब्लर तरी करा (एडिट करून) मंडळी नंतर रडत बसण्याऐवजी आधीच सावध राहा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व डॉ. धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved