Breaking News

सध्या जॉब च्या शोधात महाराष्ट्रातील हजारो तरुण आहेत.याचाच फायदा या पुण्यातील टोळीने घेयला सुरु केले आहे

*जनहितार्थ*

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव :-सगळ्यांलाच चांगला जॉब वेळेवर भेटत नाही यामूळ तरुण नौकरी च्या शोधात असतात भेटेल ती नौकरी करतात. या बद्दल सविस्तर माहिती अशी की ,काही पेपर मध्ये छोट्या जाहिरातीत रोज एक जाहिरात येते, त्या जाहिरातीतील मजकूर,”LG, Haier आणि ईतर ब्रँडेड कंपनीत पर्मनंट भरती सुरु आहे, पात्रता: 10 वी,12 वी, कोणतीही पदवी असलेले
sallery: 16000 ते 24000 + राहणे जेवण
….या नंबर वर संपर्क करा”.. असा मजकूर त्या जाहिरातीत असतो, त्या नंबर वे कॉल केला तर एक महिला बोलते, ती जाहिरातीतील माहितीच कॉल वर सांगते, बाकीची माहिती तुम्हालाइथे आल्यावर सांगतोल असे म्हणते, आणि येताना 2000 रुपये फीस, 2 फोटो आणि ओळख पत्र घेऊन या हे न विसरता सांगते.पत्ता विचारला असता रांजणगाव(पुणे) ला उतरल्यावर कॉल करा आम्ही तुम्हाला घेयला येतोत म्हणते.गरजू मूलं त्यांच्या बोलण्यात फसतात, रांजणगावला गेल्यावर कॉल केला असता ते म्हणतात गणपती मंदिर समोर हायवे वर थांबा.
लगेच 10 मिनिटात त्यांचा एक व्यक्ती गाडी वर येतो ,कॉल तुम्हीच केलता का विचारतो, आणि पैसे आनलेत का ? हे पण विचारतो.त्याला तुमचं ऑफिस कुठे आहे हे विचारले तर तो म्हणतो फीस द्या लगेच joining करून देतो.आता इतक्या लांब गेल्यावर गरजू विद्यार्थी त्याच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतात.त्यांचा व्यक्ती त्या गाडीवर घेऊन रांजणगावच्या पुढे असलेल्या LG कंपनी च्या चौकात नेतो.तिथे तो 2000 रुपये फीस,2फोटो आणि ओळख पत्र घेतो.
त्याला पावती मागितली असता तो संद्यकाळी तुमच्या रूम मध्ये आणून देतो म्हणतो.त्याच्या त्या व्यक्तीचे काम तिथेच संपते तो व्यक्ती म्हणतो आता आमचा दुसरा एक व्यक्ती येईल आणि तुम्हाला तुमच्या रूम मध्ये घेऊन जाईल.लगेच 5 मिनिटात तो दुसरा व्यक्ती येतो तो विद्यर्थ्याला घेऊन LG कंपनी च्या चौकातून मध्ये एका खेड्या गाव च्या रस्त्याला 5 ते 6 किलोमीटर मधी नेतो.
तिथे गेल्यावर तो विद्यार्थ्यां कडून 500 रुपये घेतो , कशाचे विचारले असता तो माझी फीस आहे तुमची राहायची व्यवस्था मी केली आहे म्हणतो. आणि बळजबरी पैसे घेतो.विद्यार्थ्यांला आपली फसवणूक होतेय हे तेव्हा लक्षात येत , पण गावापासून खूप लांब एका वस्तीत (झोपडपट्टीत) एकटेच आपण काय करणार, आणि एवढ्या अपेक्षेने आलोत तर 500 रुपये त्याला देऊन टाकतात.
त्यानंतर तो व्यक्ती विद्यार्थ्यांला त्यांची रूम दाखवतो.तिथे काही विद्यार्थी आपल्या सारखेच आलेले असतात.त्यांची विचारपूस केली असता ते पण आपल्या सारखे त्याच दिवशी नौकरी च्या अपेक्षेने आलेले असतात.
रूम दाखवल्यावर तो व्यक्ती सांगतो तुम्हाला 8 दिवस इथे राहावे लागेल नंतर एक फ्लॅट देण्यात येईल,तो पर्यंत adjust करा.विद्यार्थ्यांला एकमेकांला सोबत भेटल्यामुळं आणि काहीच पर्याय नसल्यामुळं ते तयार होतात.संद्यकाळी 7 ची शिफ्ट आहे असं सांगून तो निघून जातो.
विद्यर्थ्यांनी एकमेकांची विचार पूस केली असता कोणी लातूर, धुळे, औरंगाबाद, सोलापूर अश्या वेग वेगळ्या भागातून पेपर मधली जाहिरात वाचून तेसुद्धा आलेले असतात.कोना कडून 3000 तर को कडून 5000 फीस घेतली असते.संद्यकाळी 7 वाजता शिफ्ट ला जाताना तो व्याक्ती परत येतो, आपल्या जवळचे मोबाइल त्याच्या कडे देयला सांगतो आणि एका फॅक्टरी मध्ये नेतो, त्या फॅक्टरीचा आणि LG कंपनीचा काहीच संबंध नसतो, तो व्यक्ती परत म्हणतो ८ दिवस इथं तुमची training आहे नंतर LG मध्ये पर्मनंट लावणार.विद्यार्थ्यांकडे काहीच पर्याय नसल्याने ते जाऊद्या इतकं केलाय तर फॅक्टरीत एक दिवस जाऊन बघुयात नंतर पुढचं बघू असा विचार करून तयार होतात.
पण कंपनीत गेल्यावर त्यांला कळत कि काम हे पूर्ण worker चे असते जे त्यांला कॉल केल्यावर सांगितलेले नसते.
रात्रभर त्या विद्यार्थ्यां कडून ते काम करुन घेतात.जेवायच्या वेळी इतकं खराब दर्जाचं जेवण देतात ते कोणीच खाऊ शकणार नाही.
कंपनीत काम करताना जे आधीचे worker तिथे काम करत होते ते जवळ जवळ सगळेच उत्तर प्रदेश बिहार चे होते.
त्यांनी सांगितलं ते 4 महिन्या पासून जॉब करतायत आणि त्यांचा पगार केलाच नाहीय नुसतं देतो देतो म्हणून त्यांला अडकवून ठेवलं होतं.ते worker विद्यार्थ्यांला उद्याच परत जा नाहीतर हे तुम्हाला आमच्या सारखं अडकवून ठेवतेल असे म्हणाले.दुसऱ्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी परत घरी जायचं ठरवलं पण त्यांचा mobile त्या व्यक्ती कडे होता . दुपारी 12 वाजता त्याने मोबाइल आणून दिला आणि जे विद्यार्थी जॉब सोडून जायचं म्हणत होते त्यांला अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या.थोड्या वेळाने त्याने त्यांचं सामान आणि mobile परत केले आणि म्हणाला जायचं तर जा कोणाला सांगितलं तरी काही फायदा नाही. म्हणून तो निघून गेला. त्या वस्ती पासून थोडं लांब गेल्यावर त्या फॅक्टरी चा वाचमन त्यांला भेटला.त्याने सगळी माहिती त्या विद्यार्थ्यांला सविस्तर सांगितली कि रोज तुमच्या सारख्या किती तरी मुलांला हे असेच फसवतात.तुम्ही जितक्या लवकर इथून जाताल तेवढच तुमचं चांगलं आहे.तुम्ही काल रात्रभर केलेल्या कामाचे 350 रुपये एकाचे त्या व्यक्तीला फुकट मिळतात हाच त्यांचा मोठा धंदा आहे.

*ताज कलम*

*तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांला फसवणे.
2 / 3 किलोमीटर लांब गेल्यावर एक फॅमिली त्या विद्यार्थ्यांला भेटली त्यांनी सुद्धा हीच माहिती विद्यार्थ्यांला सांगितली.
त्यांनी सांगितले की तुमच्या सारखे रोज 25 ते 100 विद्यार्थी रोज इथे येतात आणि असेच फसले जातात.प्रत्येका कडून 2000 ते 5000 फीस आणि वरचे 500 ते 1000 रुपये घेतात.आणि त्याविद्यार्थ्यांनी एकदिवस जरी फॅक्टरी मध्ये काम केले तर एका जणांचे 350 रुपये रोज त्या फसवणार्यांला मिळतात. समजा आपण रोजचे 20 विद्यार्थी जरी धरले तरी त्यांला 20 जणांचे प्रत्येकी 2000 रुपये धरले तरी 40000 रुपये आणि वरचे 500 रुपये प्रत्येकी म्हणजे 10000 रुपये वरचे आणि प्रत्येकाची 350 रुपये मजुरी म्हणजेच 350×20= 7000 रुपये फुकट मिळतात.आता या सगळ्याची बेरीज केली असता,40000+10000+7000= 57000 रुपये रोज हे गरजू विद्यार्थ्यांला फसवून लुटतात.
57000 रुपये रोज हा कमीत कमी आकडा आहे जवळ जवळ 100000 रुपये रोज हे कमावतात असे तेथील काही चांगल्या राहिवास्यांनी सांगितले.
हे प्रकरण 2016 च्या आधी पासून सुरु आहे. म्हणजे या टोळी ने आता पर्यंत करोडो रुपये अशा तरुणांकडून लाटले आहेत.आपली फसवणूक झालीय हे पाहून त्या विद्यार्थ्यांला पुन्हा जॉब करायची इच्छा राहत नाही आणि त्यांचं आयुष्य बरबाद होत.आणि फसवणूक झालीय असं विद्यार्थी घरी सुद्धा सांगत नाहीत आणि तक्रार सुद्धा करत नाहीत.
एका पीडित तरुणाने मला ही घटना सांगितली त्याला 2017 मध्ये फसवण्यात आलत, त्या तरुणाने त्या टोळीतल्या 5 ते 6 जणांचे मोबाईल नंबर मला दिले आहेत.
फसवणारी टोळी इतकी शातीर आहे की ते नेहमी त्यांचे नंबर बदलत असतात.आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या ओळखपत्र आणि फोटो वरून त्याच विद्यार्थ्यांच्या नावाने नवीन सिम घेऊन दुसऱ्या विद्यार्थ्यांला फसवतात.या बाबतीत प्रशासनाने लक्ष घालावे.
यांच्यात नक्कीचकोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा हाथ आहे हे नक्की.पीडित विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी माझ्याकडे विनंती केलीय.त्या करीता हि पोस्ट टाकली आहे.
या पोस्ट ला जास्तीत जास्त पसरवा आणि नौकरीच्या नावाने फसवणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करा.
हि नम्र विनंती…

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

केंद्रीय मंत्रिमंडळ;कोणाला कोणते खाते

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव शेवगाव:-पंतप्रधान नरेंद्र मोदी – तक्रार निवारण, पेन्शन, ऑटोमिक एनर्जी आणि अंतराळ …

११ जुन रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व शैक्षणिक साहित्य वाटप व आयुष्यमान कार्ड नोंदणी शिबिर

व्हॉईस ऑफ मिडीया तर्फे अनोखा उपक्रम जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर :- व्हॉईस ऑफ मिडीया चंद्रपुर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved