विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-आज दिनांक २०/०६/२०२४ गुरवार रोजी शेवगाव -वरूर -सुसरे अश्या नवीन बस फेरीचा शुभारंभ श्रीमती सपकाळ मॅडम विभाग नियंत्रक राप अहमदनगर यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी श्री संकेत राजहंस पालक अधिकारी रा.प. शेवगाव व विभागीय भांडार अधिकारी रा.प. अहमदनगर अमोल कोतकर आगार व्यवस्थापक रा. प. शेवगाव आगार किरण शिंदे स्थानक प्रमुख शेवगाव आगार तसेच वरुर येथील सरपंच मस्के व मोरे सर तसेच वावरे सर व समस्त गावकरी हे उपस्थित होते वरूर येथील ग्रामस्थांनी लाल परीचे जल्लोषामध्ये स्वागत केले. गेली जवळपास पंधरा वर्षे या गावामध्ये रस्ता खराब असल्याकारणाने { लाल परी } एस. टी. येत नव्हती परंतु आता रस्ता चांगला झाला असल्यामुळे ग्रामस्थांची बऱ्याच दिवसांची मागणी होती, वरूर मार्गे सुसरे अशी बस चालू करावी या मागणीची दखल घेऊन आगार व्यवस्थापक राप शेवगाव कोतकर साहेब यांच्याकडे सदर बसच्या मागणीचे पत्र येतात त्यांनी तातडीने विभाग नियंत्रक यांच्याशी संपर्क साधून नवीन बस फेरी सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलली फक्त दोन दिवसांमध्ये सदर फेरी सुरू करण्याविषयी नियोजन करून आज अखेर विभाग नियंत्रक श्रीमती सपकाळ मॅडम यांचे उपस्थितीत तब्बल पंधरा वर्षानंतर एसटीचे आगमन या गावांमध्ये झाले.
गावातील सर्व गावकऱ्यांनी एसटी बसचे ढोल ताशांच्या गजरामध्ये स्वागत केले तसेच गावांमधून शेवगाव येथे शिकण्यासाठी जाणाऱ्या मुलं व मुली यांची साधारणपणे 80 इतकी संख्या आहे त्यामुळे गावकऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून मागणी होती की एसटी बस सुरू व्हावी सदर मुलींना सायकलवर शेवगाव येथे जावे लागत होते परंतु अतिशय संवेदनशील अशा विभाग नियंत्रक श्रीमती सपकाळ मॅडम यांनी सदर माहिती कळताच तातडीने बस सुरू करण्याविषयी निर्णय घेऊन आज बस सुरू करून दिली.श्रीमती सपकाळ मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला त्यांनी सुध्दा ग्रामीण भागातून एसटी बसनेच प्रवास करून शालेय शिक्षण घेतले आहे त्यामुळे ग्रामीण भागातून शहरांमध्ये जाण्याकरता विद्यार्थ्यांना एसटी बस हा एकमेव सुरक्षित व स्वस्त असा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना भावी त्यांच्या शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या व सर्व गावकऱ्यांना एसटी बसनेच सुरक्षित प्रवास करण्यासाठी आवाहन केले याप्रसंगी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विभाग नियंत्रक सपकाळ मॅडम व विभागीय भांडाराधिकारी राजहंस आगार व्यवस्थापक कोतकर स्थानक प्रमुख शिंदे तसेच वाहतूक नियंत्रक शेळके व राजहंस यांचा सत्कार केला.
*ताजा कलम*
एकेकाळी अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव आघाडी डेपो सर्वात जास्त उत्पन्न मिळवणारा मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेला व सुमारे 60 बसेस असलेला डेपो म्हणून नावलौकिक मिळविलेला आज घरघर लागल्यासारखी अवस्था झाली आहे गाड्या कुठेही बंद पडतात लांब पल्ल्याच्या पुणे कोल्हापूर नाशिक सातारा धुळे जळगाव परभणी कल्याण मुंबई अनेक बसलेल्या रद्द केल्या आहे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व नवीन प्रवासी संघटना स्थापन करावी अशी मागणी शेवगाव शहर आणि तालुक्यातील प्रवासी करत आहेत.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*