जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- पतंजलि योग समिती, ग्राम पंचायत कार्यालय खोकरला च्या वतीने दहावा आंतरराष्ट्रिय योग दिवस जिबी क्लब खोकरला येथे मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोकरला ग्राम पंचायतच्या सरपंच वैशाली सार्वे होत्या. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई झंझाळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या वर्षा वैरागडे, सरिता मदनकर, पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र झंझाळ, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, योग शिक्षक मारोती पुडके, सामाजिक कार्यकर्ता तथा योग शिक्षक विलास केजरकर, दिलीप वालदे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बैस, परिहार, योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, अंजली बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या व्याधीमुक्त व्हायचे असल्यास योग प्राणायाम करणे आवश्यक आहे असे मत माजी पंचायत समितीचे माजी सभापती नरेंद्र झंझाळ यांनी व्यक्त केले.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी खोकरला पतंजलि योग समितीचे महत्त्व तसेच आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व व विविध मार्मिक उदाहरण देऊन आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे महत्त्व व योगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश घोडे व प्रास्ताविक योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश सार्वे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेंद्र पांडे, रमेश बुरबादे, दामोधर बोदेले, गणेश उपासे, गीता आगासे, प्यारेलाल शहारे, राजकुमार वहाणे, छाया मेश्राम, नितीन कढव, महादेव खोकले, महादेव वंजारी, शालीनी बैस, मंदा चावरे, जयश्री दुधकवार, रजनी कुकडकर, कल्पना दमाहे, पंचकुला पटले, लक्ष्मीनारायण भिवगडे, वनिता अनकर, मिना रोखडे, रंगारी, शामराव गौरी, रामलाल शेंडे, केशव खोटेले, विजय मेश्राम, कृष्णा गुणेवार, महादेव चांदेवार, हेमचंद्र रोटके, श्रीकृष्ण जिभकाटे, बंडू बेहरे, प्रमिला बुरबादे, बाबुलाल दमाहे, श्रध्दा पांडे, तसेच पतंजली योग समिती, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर खोकरलाच्या महीला -पुरूष योग साधकांनी सहकार्य केले.