Breaking News

‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ – जिल्ह्यात 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त

अर्ज स्वीकारण्यासाठी एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 22 : जिल्ह्यामध्ये ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजने’ची प्रभावी अंमलबजावणी होत असून या योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी जिल्ह्यात एकूण 3901 मदत केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्राच्या माध्यमातून 20 जुलैपर्यंत 1 लक्ष 23 हजार 936 महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिला / मुलींना दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.

अशी आहे प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या : जिल्ह्यात आतापर्यंत ऑफलाइन पद्धतीने 58231 तर ऑनलाईन पद्धतीने 65705 असे एकूण 1 लक्ष 23 हजार 936 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात जिल्ह्यातील 3 शहरी अंगणवाडी आणि 15 ग्रामीण अंगणवाडी प्रकल्पामध्ये ऑफलाईन 54728, ऑनलाईन 63460 असे एकूण 1 लक्ष 18 हजार 188 अर्ज, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुविधा केंद्रात ऑफलाईन 2652, ऑनलाईन 1097 एकूण 3749 अर्ज, जिल्ह्यातील नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात असलेल्या सुविधा केंद्रात ऑफलाईन 438, ऑनलाईन 678 एकूण 1116 अर्ज तर जिल्ह्यातील विविध सेतू केंद्रामध्ये ऑफलाईन 413, ऑनलाईन 470 एकूण 883 अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील मदत केंद्राची संख्या : जिल्ह्यातील तीन शहरी व 15 ग्रामीण अंगणवाडी प्रकल्पामध्ये एकूण 2962 मदत केंद्र, ग्रामपंचायत स्तरावर 825 केंद्र, चंद्रपूर महानगर पालिका स्तरावर 36, नगरपालिका / नगर पंचायत स्तरावर 51 आणि सेतू केंद्रस्तरावर 27 असे एकूण 3901 मदत केंद्र आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात चिमूर …

पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यातील पळसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved