जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
शंकरपूर :- येथून जवळच असलेल्या खापरी येथे जीर्ण झालेल्या नाल्या व जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ योजनेमुळे घरात पाणी घुसले आहे रात्रभर चाललेय पावसामुळे संपूर्ण गाव पाण्याखाली आले होते हे पाणी काढण्यासाठी स्वतः सतीश वारजुकर यांनी जेसिपी नेऊन पाणी काढले:कवडशी डाग ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या खापरी हे गाव जवळपास 400 लोक वस्तीचा आहे या लोकवस्तीत रस्त्याच्या बाजूने खूप वर्षा आधी नाली बांधकाम झाले आहे हे बांधकाम जीर्ण झाले आहे. बऱ्याच ठिकाणी नाल्या तुटून आहे सोबतच या नालीतला गाळ उपसा न केल्यामुळे नाली ने पाणी वाहून जात नाही.
यातच जलजीवन मिशन अंतर्गत या गावात नळ योजनेचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी रस्ते खोदल्या गेलेले आहेत त्यामुळे त्या रस्त्याची माती रस्त्यावरच पडून असल्यामुळे गावात पाणी साचलेला आहे हेच पाणी गावातील घरात व अंगणात गेले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
यात प्रामुख्याने काशीराम रामटेके भगवान वाडके हमराज शेंडे राजेंद्र रामटेके हिराचंद रामटेके विनायक चव्हाण गुलाब शेंडे आधी लोकांच्या घरात व अंगणात पाणी घुसले आहे आर्थिक नुकसान जरी झाले नसलेतरी पण यांच्या अंगणात जवळपास एक ते दीड फूट पाणी साचलेले आहे हे पाणी बाहेर निघत नसल्यामुळे गावकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झालेली आहे तसेच पाणी साचल्यामुळे डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने गावात रोगराई येण्याची भीती निर्माण झालेली आहे ही बाब माझी जी प अध्यक्ष सतीश वारजुकर यांना माहीत होताच त्यांनी गावात जाऊन पाहणी केली जिसिपी बोलाऊन संपूर्ण पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला तो पर्यंत ते उपस्थित होते.