“१५ लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट नालीच्या बांधकामाचा शुभारंभ”
“घर पडलेल्या अकरा नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत”
“गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप”
“पावसामुळे पिकांचे झाले नुकसान”
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील म्हसली येथे मावळा ग्रुपच्या वतीने आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण व ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजनेअंतर्गत १५ लक्ष रुपयांच्या सिमेंट काँक्रीट नालीच्या बांधकामाचा शुभारंभ सोहळा आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या पुढाकारातून व शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी म्हसली ग्रामवासीयांच्या वतीने आ. बंटीभाऊ भांगडिया यांचा वाढदिवस केक कापून व शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करीत आभार व्यक्त केले.
“घर पडलेल्या अकरा नागरिकांना आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी दिली तात्काळ आर्थिक मदत”
सिरसपूर येथील अकरा घरे पडली याची माहिती मिळताच आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी आपल्या खाजगी निधीतुन सिरसपूर येथील घरे पडलेल्या अकरा नागरिकांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली.
चिमूर तालुक्यात पुरामुळे सर्वत्र परीसर जलमय झाली असून सिरसपूर गावातील श्रीकृष्ण मसराम, देवेंद्र तणले, वसंता डोये, कुंडलीक देहाळकर, दिवाकर काकडे, विजय नेवारे, विलास डोये, राजेंद्र दडमल, वच्छला दडमल यांची घरे पडली. त्यांचे वर आर्थिक संकट पडले असताना तेव्हा आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या सूचनेनुसार त्या घर पडलेल्या ग्रस्तांना आर्थिक मदत दिली.
“गरजवंत विद्यार्थ्यांना सायकल वाटप”
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या कडून वाढदिवस निमित्त दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्याचा सामाजिक उपक्रम राबविले जातात यावर्षी सुध्दा शहीद बालाजी रायपूरकर सभागृह येथे सायकल मंजूर प्राप्त विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले असून सायकल वाटप कार्यक्रम सुरूच आहे. याकरिता विद्यार्थ्यांना मंजूर यादीत नाव असणे आवश्यक असून सोबत आधारकार्ड आणावे. सायकल वाटप प्रसंगी प्रशांत चिडे, कुणाल कावरे,सचिन फरकाडे, विकी कोरेकर, गणेश मेहरकुरे, पवन अल्लीवार, रिंकू सातपुते,सौरभ बडगे,पराग अंबादे,मोनू गौरकर, अरबाज खान राकेश कामडी,प्रणित सातपुते, जिवन नागोसे आकाश दुर्गे,बादल बडगे सुद्धा उपस्थित राहून सहकार्य करीत आहे.
“पावसामुळे पिकांचे झाले नुकसान”
खानगाव, सावरी येथील शेतकरी बाधंव यांच्या सोबत पिक विमा व तीन दिवसात पडलेल्या पावसाने पिकांवर जो परिणाम झाला. त्या विषयावर चर्चा केली.आमदार बंटी भाऊ भागंडिया शेतकरी यांच्या भक्कमपणे पाठिशी आहे. सातत्याने कुषी विभाग व महसूल विभागाच्या संपर्कात असल्याची माहिती दिली. एकनाथ थुटे, समीर राचलवार, पवन निखाडे, रोशन बनसोड, रवी कोलते. व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.