Breaking News

नारायणगव्हाणच्या विद्यार्थ्यांचा आण्णा हजारेंकडून झालेला सन्मान हा सर्वात मोठा आशिर्वाद-विद्या पवळे

एव्हरेस्ट ॲबॅकस ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी गणितात कॅल्युलेटरलाही मागे टाकले- विद्या पवळे(ॲबॅकस शिक्षिका)

विद्यार्थ्यांच्या यशाचा होणारा सन्मान हाच खऱ्या अर्थाने शिक्षकांचा गौरवच

प्रतिनिधी – अहमदनगर

चौकट :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात आवड निर्माण करून आधुनिक शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणार असुन विद्यार्थांना मिळणारे यश हिच आमच्या कामाची खरी पावती असुन आजच्या व्यवहारात गणित हा अत्यंत महत्वाचा भाग असुन एव्हरेस्ट ॲबॅकस ॲकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थांना कॅल्युलेटरपेक्षाही जास्त स्पिडने गणिते सोडवत आहेत विद्यार्थ्यांना मिळालेले यश आणि त्यांचा होणार सन्मान हाच आमचा खऱ्या अर्थाने गौरव आहे -विद्या पवळे (ॲबॅकस शिक्षिका) पारनेर येथे संपन्न झालेल्या २४व्या नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये नारायण गव्हाण अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या कॉम्पिटिशन मध्ये अगदी पाच मिनिटांमध्ये गणिताची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशी उदाहरणे सोडवली. या कॉम्पिटिशन मध्ये 2000विद्यार्थी सहभागी होते.या अति तटीच्यास्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अगदी जीव ओतून उदाहरणे सोडवून उत्तम असे यश संपादन केले.

यामध्ये विद्या शेळके,अनुष्का शेळके सरोदे कृष्णा, खोले वैष्णवी, राजवर्धन शेळके,पवळे राणा,भोसले श्रवण,फटांगडे आरोही, चव्हाण स्वरांजली,शेळके श्रेया,सुपेकर यश,बांगडे हर्षल,देवश्री शेळके,शेळके पार्थ,शेळके रिद्धी या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश मिळवलेले आहे. यामध्ये मोलाचे मार्गदर्शन रेशमा कळमकर,कल्पना घडेकर यांसह सहकाऱ्याचे लाभले गुरु पूर्णिमेचे औचित्य साधून पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते या नॅशनल कॉम्पिटिशन चे बक्षीस वितरण केले गेले या प्रसंगी अण्णा हजारेंकडून केलेल्या मार्गदर्शनातून मुलांना नवीन प्रेरणा मिळाली.विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही प्रगती करावी असे मार्गदर्शन अण्णांनी केले.विद्यार्थी हेच राष्ट्राची खरी संपत्ती असून,त्यांची शैक्षणिक होणारी उन्नती हीच राष्ट्राची खऱ्या अर्थाने प्रगती आहे ,असे आशीर्वाद रुपी कौतुकाची थाप टाकत अण्णांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्वीकारला कार्यभार

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा )- नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी आपल्या पदाचा कार्यभार …

मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वाखाली वरोरा-भद्रावती विधानसभेत प्रचाराला वेग

एक हजार टी-शर्टचे वितरण, निवडणुकीसाठी भक्कम तयारी सुरू जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर भद्रावती :-  शिवसेना (उद्धव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved