आमदार बंटी भांगडिया पुरस्कृत संत भैय्यूजी महाराज विद्यालयात नोट बुक वितरण कार्यक्रम
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना गुरुजनाचा आदर करीत व्यसन मुक्त राहून आदर्श जिवन जगण्याचे मार्गदर्शन भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे यांनी सांगत भांगडिया फाउंडेशन चा सामाजिक कार्य अविरहित राहणार असल्याचे सांगितले. संत भैय्युजी महाराज विद्यालय चिमूर येथे नोट बुक वितरण कार्यक्रम प्रसंगी मंचावर भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, युवा मोर्चा प्रदेश सचिव मनिष तुंम्पलीवार, विद्यालय चे संचालक गिरीष भोपे, भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे, मंगला शिवरकर मोहिनकर (शिक्षिका )उपस्थित होते.
शिंदे फडणवीस पवार महायुती सरकार ने मुलींना मोफत शिक्षण जाहीर केले असून मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे आणि आपले नाव उंच करावे असे मत भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पलीवार यांनी व्यक्त केले.
संचालन पंधरे तर आभार गजभिये शिक्षक यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना नोट बुक वितरण प्रसंगी श्रेयस लाखे, अमित जुमडे, राजु बोडने, सौरभ बडगे आकाश दुर्गे, गोलू मालोदे, नितीन बघेल,नरेंद्र हजारे गणेश मेहरकुरे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.