अतिवृष्टीमुळे शेत पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना शेतकरी 70 हजाराची नुकसान भरपाई देण्यात यावे
तालुका प्रतिनिधी-सलीम शेख नागभीड
नागभीड :- नागभीड तालुक्यामध्ये मागील चार -पाच दिवसापासून मुसळधार पावसाची हजेरी लावलेली आहे नागभीड तालुक्यातील सर्व नदी नाले तळे भरगोछ भरून वाहू लागली आहे सतत धार-धार पावसामुळे सर्व परिसर जल मयझाले असून शेतामध्ये पावसाचे पाणी साचले आहे नदीला नाल्याला महापूर असल्याने महापुराचे पाणी शेतात गेल्याने शेतात असलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत.
शेतकरी राजा अधिक चिंतेत होते ग्रस्त झालेल्या गंभीर बाबीची प्रशासनाने नागभीड तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी प्रहार जनशक्ती पक्ष नागभीड तालुका अध्यक्ष वृषभ खापर्डे यांची मागणी. सतत होत असलेल्या असमानी संकटामुळे शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या मुक्तानीमुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी.