Breaking News

विद्यार्थीला उच्च शिक्षणासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची तात्काळ शैक्षणिक मदत

वाघाने हल्ला चढवून जखमी केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत

नेरी येथे अतिवृष्टीमुळे घरे पडलेल्या आपद्ग्रस्त कुटूंबियांना तात्काळ आर्थिक मदत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर तालुक्यातील गरडापार येथील एका हुशार विद्यार्थ्यांचा गव्हर्नमेंट पालिटेक्निक नागपूर येथे मेकॅनिकल इंजिनिअर करीता नंबर लागलेला होता मात्र घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने जितेंद्र श्रीकृष्ण नन्नावरे हा विद्यार्थी फी भरू शकत नव्हता आणि फी भरण्याची अंतिम तारीख असल्याने त्यांच्या भविष्यचा प्रश्न निर्माण झाला होता. याची माहिती आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना मिळताच अशा हुशार होतकरू मुलाच्या भविष्याची चिंता वाहणारे आमदार यांनी त्वरित शैक्षणिक मदत पुरविली व पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

“वाघाने हल्ला चढवून जखमी केलेल्या शेतकऱ्यांना आ.बंटीभाऊ भांगडीया यांची आर्थिक मदत”

दिनांक ४/०८/२०२४ ला कवडु मन्साराम सावसागडे वय वर्षे ५५ धंदा शेती रा.किटाळी व बालाजी गणपत नन्नावरे वय वर्षे ५२ रा. गरडापार तसेच बाबाराव दडमल वय वर्षे ४५ रा. ऊरकुडपार आणि दोमोधर नन्नावरे रा.नवेगाव पेठ असे चारही शेतकऱ्यांना दबा धरुन बसलेला वाघाने जखमी केले.यांची माहिती आमदार बंटी भांगडीया यांना मिळताच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांना तात्काळ पाठवून आर्थिक मदत दिली. यावेळी

“नेरी येथील घरे पडलेल्या ग्रस्तांना आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी तात्काळ दखल घेत केली आर्थिक मदत”

मागील आठवड्यापासून सततधार मुसळधार पाऊस पडत असल्याने चिमूर तालुक्यातील नेरी येथील तीन घरे एकाच वेळी जमीनदोस्त झाली मात्र जिवीतहानी झाली नाही यात छायाताई दिनकर पंधरे ,सुनीता सोनुने, मधुकर सोनुने यांची घरे पडली सदर घटनेत तिन्ही घरातील जीवनावश्यक वस्तू जमिनीत दबल्या गेल्या तसेच अनेक सामानाची मोडतोड झाली त्यामुळे सदर आपद्ग्रस्त कुटूंबीय उघड्यावर आले सदर घटनेची माहिती नेरी येथील जी प सर्कल प्रमुख संदीप पिसे यांनी भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे काकाजी याना दिली त्यांनी तात्काळ सदर आपत्कालीन घटना चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना मिळताच क्षणी तात्काळ तिन्ही घरे पडलेल्या कुटुंबीयांना जेष्ठ भाजपा नेते रामेश कंचर्लावार आणि त्याच्या सहकार्याच्या हस्ते आर्थिक मदत कुटूंबियांना देण्यात आली.

यावेळी विक्की कोरेकर विलास कोराम महामंत्री भाजपा संदीप पिसे सर्कल प्रमुख नेरी सिरपूर जी प दत्तूभाऊ पिसे भाजपा सहकार आघाडी प्रमुख गणेश मेहरकुरे रामचंद्र कामडी गुरुजी महेश पंधरे आदीसह गावकरी तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved