जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
यवतमाळ :- राळेगाव विधानसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदार संघ आहे या मतदारसंघात काही धनाड्य आणि परंपरागत चालत असलेल्या राजकारणाचाच वाव राहतो पण गेल्या वीस पंचवीस वर्षात या मतदारसंघातील जनसामान्य चे कुठलेही काम सत्ताधाऱ्यांनी किंवा विरोधकांनी ऐरणीवर आणले नाही त्यामुळे येथील लोक नवीन चेहऱ्याच्या प्रतीक्षेत आहे संभाजी ब्रिगेड राळेगाव विधानसभा क्षेत्रात नवीन जोमाचा उमेदवार लढवणार आहे असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांनी सांगितले राळेगाव, कळंब आणि बाभूळगाव या तिन्ही तालुक्यात संभाजी ब्रिगेड ची चांगली पकड आहे त्यामुळे येथे संभाजी ब्रिगेडचा उमेदवार निवडून येऊ शकतो गेल्या दहा वर्षा जे विद्यमान आमदार आहे.
त्यांनी साधी पिण्याची पाण्याची सोय सुद्धा या विधानसभेला दिली नाही किंवा माजी मंत्र्यांनी आदिवासीबहुल भाग असून सुद्धा येथील तालुके पेसा मधी टाकून सुधारण्याचा काम सुद्धा केले नाही तरी यावेळेस राळेगाव विधानसभेमध्ये संभाजी ब्रिगेड ताकतीने उमेदवार देऊन नवीन चेहऱ्याला संधी देणार आहे असे राळेगाव तालुकाध्यक्ष शाहरुख शेख यांनी पत्रकाराला बोलताना सांगितले आज दिनांक 8 /8 /2024 ला विश्रामगृह राळेगाव येथे संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सुरज खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात तर तालुक अध्यक्ष शाहरूख शेख तालुक अध्यक्ष कळंब आतिफ देशमुख यांच्या नेतृत्त्वात पदाधिकारी बैठक संपन्न झाले सादिक शेख जिल्हा कार्याध्यक्ष तालुक सचीव मंगेश वगरहांडे वडकी शहर अध्यक्ष प्रमोद बोंबले हर्षिल सिडाम प्रेम सिडाम महेश खडसे आदि उपस्थित होते.