तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजाराची नुकसान भरपाई देण्यात यावी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडल्याने सर्व नदी नाले तळे भरगोछ भरुन वाहू लागले असून सर्वत्र परीसर जलमय झाले आहे. अतिवृष्टीमुळे पावसाने फार मोठ्या प्रमाणावर शेतीची नुकसान झाले असून तालुक्यातील शेतकरी कर्ज घेऊन कर्जबाजारी झाले आता कसे फेडणार याची चिंता सतत शेतकऱ्यांना सतावत आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात.
याची गंभीर दखल घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी 70 हजाराची नुकसान भरपाई द्यावी व चिमूर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव गजानन बुटके यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधुन सविस्तर चर्चा केली. शेतकरी बांधवांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रशासनास मागणी करण्यात आली आहे.