जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
राळेगाव:-दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मोहित राजेंद्र झोटींग यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रोगनिदान, उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक १२ऑगस्ट रोजी सोनामाता हायस्कुल चहांद येथे करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटींग हे दरवर्षी स्व. मोहीत यांच्या स्मृतिदिनानिमीत्य सामाजिक जाणिवेतून सामाजिक उपक्रम राबवित असतात.स्व मोहित यांचे सहा वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले होते.आपल्या एकूलत्या एक मुलाचे देहदान करण्याचा निर्णय राजेंद्र झोटींग यांनी घेऊन नागपूर मेडिकल कॉलेजला त्याचा मृतदेह सुपूर्द केला होता हे विशेष.या आरोग्य व रक्तदान शिबिराचे उद्धघाटन आमदार डॉ अशोक ऊईके यांच्या हस्ते होत.
असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ पवन मांडवकर प्रमुख उपस्थिती चित्तरंजनदादा कोल्हे मा जि प सदस्य, प्रितीताई काकडे मा जि प सदस्या प्रविणभाऊ कोकाटे मा प स सदस्य, अशोकराव पाटील मा प स सदस्य,सूखदेव भोरकडे पोलिस निरीक्षक, रुपाली राऊत सरपंच, अनिल धोबे मुख्याध्यापक या मान्यवरांच्या उपस्थितीत आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न होईल.दि.१२ ऑगस्टला होणाऱ्या सर्व रोगनिदान शिबिराचां तालुक्यातील नागरीकांनी लाभ घ्यावा व रक्तदान शिबीरात रक्तदान करण्यासाठी तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन , डॉ पंकज टापरे, प्रकाश चिव्हाणे,दिलीप बांगरे,अतूल दांडेकर, डॉ राजश्री टापरे, प्रशांत अहिरकर प्रदिप झोटिंग व दत्तकृपा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.