पोलीसांनी ६१,७७५/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/भिसी :- भिसी पोलीसांना बातमीदार मार्फत गोपनीय माहिती मिळाली असता भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चांदे यांच्या मार्गदर्शनात पोस्ट मधील महिला पोलिस उपनिरीक्षक शुभांगी पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र वाघ, सहाय्यक फौजदार भास्कर आत्राम, दिलीप वाघमारे, पोलीस अंमलदार लोकेश खोब्रागडे,मनोज गायकवाड असे पथक तयार करून मिळालेल्या माहितीनुसार भिसी येथील जंगल परिसरात सापळा रचून धाड (रेड) टाकली असता घटनास्थळावरून ५२ ताश पत्त्यावर हार जीतचा जुगार खेळ सुरू होता.
या कारवाईत पाच इसमाविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये पोलीस स्टेशन भिसी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी एकुण ६१,७७५/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. गुन्ह्यातील पुढील तपास API चांदे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात भिसी पोलीस करीत आहे.