जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर भिसी राष्ट्रीय महामार्गावर मुंगले यांच्या शेता जवळ एसटी बस व फोर व्हीलर गाडीचा झाला अपघात. या अपघातात नागभीड येथील तहसीलदार प्रताप वाघमारे व एसटी बस मधील एक महिला गंभीर जखमी झाले. रस्त्यावर अपघातग्रस्त वाहन (एसटी बस) आडवे झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळित झाली होती. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व दोन्ही बाजूचा मार्ग मोकळा केला.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 08/11/2024 ला सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास पुरुषोत्तम गणपत खडसे वय -49 वर्षे,धंदा नोकरी (बस ड्रायव्हर )राहणार -उमरेड जिल्हा नागपूर हे चिमूर डेपो येथून उमरडे कडे बस क्रमांक एम एच 40 एन – 8780 ने प्रवासी घेऊन चिमूर – भिसी राष्ट्रीय महामार्गाने जात असताना मुंगले यांचे शेता जवळ अचानक भरधाव वेगाने भिसीकडून चिमूर मार्गे येणाऱ्या I-20 कार क्रमांक MH40 AR-7756 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून समोरील एसटी बसला बाजूंनी धडक दिल्याने बस मधील एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली असून एसटी बसचे नुकसान झाले असता MH40 AR-7756 चे चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन भिसी येथे अपराध क्रमांक 208/24 कलम 281, 125(a) भारतीय न्याय संहिता,सह कलम 184 मोटर वाहन अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला. पुढील तपास PSI चांदे ठाणेदार भिसी यांचे मार्गदर्शनात पो. उपनि. शुभांगी पाटील करीत आहे.
चिमूर उमरेड राष्ट्रीय महामार्गावर दिवसेनदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.